crime_women
crime_women 
विदर्भ

अपहरण करून गर्भवतीवर सामूहिक अत्याचार 

सकाळवृत्तसेवा

अमरावती : गर्भवती महिलेचे अपहरण केल्यानंतर बडनेरा परिसरात तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 28) घडली. फ्रेजरपुरा ठाण्यात या प्रकरणी भातकुली पंचायत समितीच्या अधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन परसराम गुल्हाने व सय्यद राशिद या दोघांवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. गुल्हाने हे भातकुली पंचायत समितीत पोषण आहार अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या कटात सहभागी म्हणून गुल्हाने यांच्या अधिकारी पत्नीसह अन्य एका महिलेचाही समावेश असल्याचा आरोप पीडित महिलेने केला. पोलिसांनी दोन महिलांना या कटात सहआरोपी केले आहे.

पीडित महिला (वय 24) ऑटोची वाट बघत फ्रेजरपुरा परिसरातील त्रिकोणी बगीचाजवळ उभी होती. त्या वेळी अचानक एका वाहनातून आलेल्या तिघांनी तिला बळजबरीने वाहनात बसविले. त्या वेळी गुल्हाने व सय्यद राशिद या दोघांसह अन्य दोन महिलाही त्यात होत्या. त्यापैकी एकाने पीडितेला चाकूचा धाक दाखवून बडनेरा परिसरात नेले. गर्भवती असताना दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. शिवाय तिला मारहाणही करण्यात आली, असेही पीडितेने तक्रारीत नमूद केले. अपहरण व मारहाणीच्या कटात गुल्हाने यांची पत्नी व अन्य एक महिला सहभागी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बडनेरा परिसरात अत्याचार केल्यानंतर पीडितेला तेथेच सोडून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

परिसरातील काही नागरिक व पोलिसांच्या मदतीने पीडितेने फ्रेजरपुरा ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरण व सामूहिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT