जेवनाळा : शारीरिक कसरतीसाठी तयार मैदानात हजर झालेले पोलिस अधिकारी व युवक. 
विदर्भ

प्रेरणादायी! एका पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाने गावखेड्यातील तरुण लागले स्पर्धा परीक्षेच्या तयारीला

अभय भुते

जेवनाळा (ज. भंडारा) : ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना भरपूर मेहनत करूनही मनाप्रमाणे यश मिळवण्यात अडचण येते. परंतु, पालांदूर येथील सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी परिसरातील युवकांसाठी मार्गदर्शन केंद्र व भौतिक तयारीसाठी उपयुक्त साहित्य भेट दिले आहे.

यातून त्यांनी पोलिस अधिकाऱ्याची सामाजिक बांधिलकीची ओळख करून दिली. याबद्दल राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या कार्याची दाद दिली आहे.

लाखनी तालुक्‍यातील पालांदूर चौ पोलिस स्टेशनअंतर्गत ६० गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी येथील यंत्रणेवर आहे. येथील पोलिस ठाण्यात ३० एप्रिल २०२० पासून सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

यादरम्यान कोरोना संसर्गाची मोठी लाट असताना क्षेत्रातील सुव्यवस्था त्यांनी योग्यपणे सांभाळली आहे. याच बरोबर स्वतः साधारण कुटुंबातून असल्याने बेरोजगार युवकांसाठी काही करावे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

त्यांनी तई, मेंढा, सायगाव, मुरमाडी, पालांदूर येथे अभ्यासिका, वाचनालये व काही ठिकाणी मैदानी चाचणीसाठी स्वखर्चाने मैदान निर्मिती करून दिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात गरजू विद्यार्थी जोमाने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. त्याच बरोबर मुलींना या प्रक्रियेत सहभागी होत ४० मुलीसह ५०० तरुण नियमित शारीरिक चाचणी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत.

खाकीची सामाजिक बांधिलकी

यातून खाकी वर्दीची सामाजिक बांधिलकी दिसून येत आहे. त्यांच्या या कार्याची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल घेत ट्‌विटरच्या मध्यमातून अभिनंदन केले आहे.

व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न

परिसरातील नागरिक व तरुणांना व्यसनमुक्त राहण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी याकरिता अनेक ठिकाणी मार्गदर्शन करून निरोगी आरोग्याचे धडे दिले आहेत. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन सांगून ते समाज उपयोगी ठरत आहेत.


तरुणांनी या संधीचे सोने करावे
मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मला स्वतःला अपुऱ्या मार्गदर्शनामुळे नाशिकला जाऊन तयारी करावी लागली होती. परंतु आता कोरोना संसर्ग असल्याने परिसरातील तरुण अशा समस्यांना तोंड देताना दिसले. त्यामुळे आम्ही पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात ही चळवळ सुरू केली आहे. आम्हाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. परिसरातील तरुणांनी या संधीचे सोने करावे ही अपेक्षा आहे.
-दीपक पाटील
सहायक पोलिस निरीक्षक


ठाणेदार पाटील यांनी सुरू केलेली स्पर्धा परीक्षेची चळवळ प्रसंशनीय आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी नक्कीच शासकीय सेवेत पात्र होतील. त्यांच्या कामाची गृहमंत्र्यांनी दखल घेतली हे उल्लेखनीय आहे.
- पंकज रामटेके
सरपंच, पालांदूर.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT