राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद  
विदर्भ

राष्ट्रपती आज सेवाग्रामात

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या, शनिवारी (ता. 17) सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रौप्यमहोत्सवी समारंभाकरिता येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन बापूकुटीचे दर्शन घेतील.
राष्ट्रपती महोदय शनिवारी (ता. 17) सकाळी पावणेअकराला नागपूर येथून सेवाग्रामकडे प्रयाण करतील. सकाळी 10.55 ला सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. सकाळी 11 वाजता हेलिपॅड येथून बापूकुटीकडे प्रस्थान करतील. सकाळी 11.30 पर्यंत बापूकुटी येथे उपस्थिती राहतील. तिथे बापूकुटीत प्रार्थना व आश्रमाची पाहणी करतील. राष्ट्रपतींच्या हस्ते आश्रम परिसरात वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. सकाळी 11.30 ते 12.25 या कालावधीत महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. संस्थेने रौप्यमहोत्सवानिमित्त भव्य सभागृहाची उभारणी केली आहे.
राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेच्या प्रगतीत बहुमोल योगदान देणारे माजी प्रधान अध्यापक डॉ. ओ. पी. गुप्ता, डॉ. पी. नारंग, डॉ. एस. छाबरा, डॉ. बी. एस. गर्ग, डॉ. के. आर. पातोंड यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती लगेच हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रस्थान करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT