sevagram 
विदर्भ

सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष प्रभू पायउतार, सर्व सेवा संघाने केला हा आरोप 

सकाळवृत्तसेवा

सेवाग्राम (जि. वर्धा) : महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. एन. आर. प्रभू यांनी गांधी विचारांना हरताळ फासत कारभार चालविल्याने त्यांना पायउतार करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली. हा निर्णय 18 मार्च रोजीच घेण्यात आला असला तरी त्याविषयी आता उघड झाले. याविषयी श्री. प्रभू यांचे मत जाणण्याचा प्रयत्न केले असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित विधायक कार्य करण्याकरिता सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या आश्रमाच्या अध्यक्षांची निवड सर्व सेवा संघ करीत असते. 2018 मध्ये केरळ येथील टी. एन. आर. प्रभू यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून आश्रमाचा कारभार प्रभू सांभाळत होते. या दरम्यान गांधी विचारांना अभिप्रेत असलेली कामे न करता ते स्वतःच निर्णय घेत होते, सर्व सेवा संघाला विश्‍वासात घेत नव्हते, असा आरोप त्यांच्यावर होता. याबाबत त्यांना अनेकदा समजविण्यात आले; मात्र दाद न दिल्याने त्यांना पायउतार करण्यात आले. 18 मार्चला पायउतार केल्यानंतर त्यांनी 27 मार्चला गावी केरळला जाण्याकरिता तिकीट काढले होते. मात्र लॉकडाउन घोषित झाल्याने ते येथेच राहिले, असे महादेव विद्रोही यांनी सांगितले. 

अध्यक्ष श्री. प्रभू यांना पायउतार केल्यानंतर अध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांना देण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्री. प्रभू यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे पत्र संचालक मंडळाला पाठविले. यानंतर शनिवारी (ता. 23) मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा रीतसर कारभार सोपविण्यात आला. त्यामुळे हा घटनाक्रम उजेडात आला. 

टी. एन. आर. प्रभू हे आश्रमाच्या नियमांना अनुसरून कामे करीत नव्हते. त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांना बाजूला सारून अनेक कामे केली. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार करण्यात आले. 
- महादेव विद्रोही 
अध्यक्ष, सर्व सेवा संघ 

अध्यक्षांनी संचालक मंडळाकडे राजीनामा दिला आहे. लॉकडाउनमुळे बैठक होऊ शकली नाही. लॉकडाउन उघडल्यावर यावर बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल. कदाचित राजीनामा परतही केला जाईल. आश्रमात मतभेद आहे; पण मनभेद नाही. 
- मुकुंद मस्के, मंत्री, आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT