desi liquor.jpg 
विदर्भ

देशी दारूच्या कॉर्टरची किंमत 55 वरून 200 रुपये; येथे सहज होते उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा वापर राज्य शासनाच्यावतीने करत संचारबंदी लागू केली. मात्र, याच कालावधीमध्ये देशी व विदेशी दारुचे दुकानाने पूर्णपणे बंद ठेवल्याने चोरून दारू विकणाऱ्यांनी एक देशी दारुची एक कॉर्टर 180 एमएलची ही 55 रुपयाला सरकारमान्य देशी दारुच्या दुकानात मिळत होती. आता बंदीच्या काळात हिच दारुची बाटली 200 रुपयात मिळत आहे. या चोरट्या विक्रेत्यांना दारू संचारबंदी काळात कशी सहज उपलब्ध होते, हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. 

जिल्ह्याचा दारूबंदी विभाग करतो तरी काय असा सवाल सर्वसामान्याला पडला आहे. लोकांना जीवनावश्‍यक वस्तू आणण्यासाठी मोठी दमकछाक होते तर काहींनी पोलिसाच्या सौम्य लाठीमाराला सामोरे जावे लागले आहे. देशी दारू पिणारा वर्ग हा मोल मजुरी करणारा असून, संचारबंदी काळ असल्याने या मजुरांना काम नाही तर पैसा कोठून राहणार अशा परिस्थितीत देशी दारूची विक्री कशी होते. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. देशी दारू सर्रासपणे विक्री होत असल्याने जिल्ह्यातील दारूबंदी विभाग संपूर्णपणे क्वारंटाईनमध्ये असल्यासारखा झाल्याचे दिसत आहे.

आवश्‍यक वाचा - बाळा मी लवकरच येईल...

हा प्रकार थांबविला पाहिजे
दारुबंदीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देवून हा प्रकार थांबविला पाहिजे. संचार बंदीच्या काळात हा प्रकार होत असल्याने ही बाब गंभीर आहे. पोलिसांवर इतरही कामाचा ताण असल्यामुळे सदर विभागाने कारवाईसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- नीलेश बंगाळे, बुलडाणा जिल्हा समन्वयक दारू मुक्त अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Mane Resigns : माजी मंत्री बाळासाहेब पाटलांना मोठा धक्का; मानेंनी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, अजितदादांच्या पक्षात करणार प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar Crime: तक्रारदारच निघाला आरोपी; व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी लुटीचा बनाव

Latest Marathi News Live Update : खासदार सांस्कृतिक महोत्सवात आज सामुहिक गीता पठणाचे आयोजन

Nagpur News: गडकरी प्रमुख पाहुणे असताना स्टेजवर दोन महिला पोस्टमास्टरमध्ये धक्काबुक्की अन् शाब्दीक खटके; नेमकं काय घडलं?

१८०० कोटींचा जमीन घोटाळा, गुन्हा दाखल झालेले तिघे कोण? पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? वाचा A to Z

SCROLL FOR NEXT