Prime Minister narendra modi will take class through Pariksha Pe Charcha held at Talkatora Stadium in Delhi esakal
विदर्भ

Pariksha Pe Charcha : ‘परीक्षा पे चर्चा’ द्वारे पंतप्रधान घेणार वर्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम जानेवारीत नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये होणार

प्रभाकर कोळसे

नंदोरी जि. वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम जानेवारीत नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे. यात इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी काही प्रश्न तयार करतील. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एनसीईआरटी) निवड केलेले काही प्रश्न कार्यक्रमात प्रत्यक्ष घेतले जाऊ शकतात. ऑनलाइन सृजनात्मक निबंध लेखन स्पर्धा घेण्यात येणार असून यात सहभागी होण्यासाठी डिसेंबरअखेर नोंदणी करता येणार आहे. २०१८ पासून ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा ‘परीक्षा पे चर्चा’ २०२३ स्पर्धेतील विजेत्यांना पंतप्रधानांसोबत कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि परीक्षेचे किटही देण्यात येणार आहे.

निबंध स्पर्धेसाठी विषय

विद्यार्थ्यांसाठी आमचे स्वातंत्र्य सैनिक, आमची संस्कृती व आमचा अभिमान, माझे प्रेरणादायी पुस्तक, पुढील पिढीसाठी पर्यावरण संरक्षण, माझे जीवन, माझे आरोग्य, माझे नावीन्यपूर्ण व्यावसायिक बनविण्याचे स्वप्न, चौकटीबाहेरचे शिक्षण, शाळेत शिकण्यासाठी खेळणी आणि खेळ

शिक्षकांसाठी आमचा वारसा, अध्ययनपूरक वातावरण कौशल्याधारित शिक्षण, अभ्यासक्रमाचे कमी ओझे व भयमुक्त परीक्षा, शिक्षणातील भविष्यकालीन आव्हाने

पालकांसाठी माझे मुल, माझे शिक्षक, प्रौढ शिक्षण सर्वांना साक्षर बनविते, सर्व शिका आणि पुढे जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT