विदर्भ

Samruddhi Highway Bus Accident : अनर्थ टळला! समृद्धी महामार्गावर पुन्हा धावत्या बसला आग; 32 प्रवासी थोडक्यात बचावले

रोहित कणसे

समृद्धी महामार्ग आणि अपघात हे ठरलेलं समीकरण झालं आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला असून एका धावत्या खाजगी लक्झरी बसला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवर मेहकरजवळ चेनेज २८० वर ही घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बसमधील एसीमध्ये शॉर्ट सक्रिट झाल्याने ही आग लागली. या खासगी बसमध्ये ३० प्रवाशी व दोन चालक होते. सुदैवाने चालकाने तात्काळ प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सिद्धी ट्रॅव्हल्सची ही बस अमरावतीहून पुण्याकडे जात होती.

यापूर्वी देखील बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर अपघातात खासगी बस आधी एका खांबाला आदळली, त्यानंतर डिव्हायडरला आदळून उलटली. यामुळे या बसला आग लागली. ही आग डिझेलच्या टँकपर्यंत पोहचल्याने स्फोट झाला. ३० जून आणि १ जुलै रोजीच्या मध्यरात्री झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघाताने राज्यासह देशाला हदरवून सोडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT