File photo 
विदर्भ

श्‍वानांच्या जन्मदर नियंत्रणावर आचारसंहितेची कात्री

रूपेश खैरी

वर्धा : शहरात मोकाट श्‍वानांनी चांगलाच कहर केला आहे. त्यांच्या हल्ल्यात आणि चाव्यामुळे अनेक जण जखमी झाले आहे. यामुळे या मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना खुद्द पालकमंत्र्यांनी दिल्या. या सूचनेवरून तसा प्रस्ताव पाठविल्याची माहिती पालिका देत आहे तर असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे नियोजन विभाग सांगत आहे. आता तर आचारसंहिता आहे. या दोनही विभागाच्या अनागोंदीमुळे मोकाट श्‍वानांच्या नसबंदीकरिता आचारसंहिता उठण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शहरातील मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्याकरिता नागरिकांकडून अनेकवेळा मागणी करण्यात आली. पण, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. परिणामी नागरिकांनी थेट पालकमंत्र्यांच्या जनतादरबारात हा मुद्दा नेला. यावर पालकमंत्र्यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेत या कामाकरिता जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा सूचना केल्या. नियोजन विभागाकडून वर्धा नगरपालिकेला तशी माहिती पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पालिकेने या कामाकरिता दहा लाखांचा खर्च असल्याचा प्रस्ताव सादर केला. पण, जिल्हा नियोजन विभागाकडून या संदर्भात काहीच हालचाल केली नाही, आणि या अपयशाचे खापर पालिकेवर फोडल्याचे येथील अधिकाऱ्याच्या बोलण्यावरून दिसते आहे.
आता तर आचारसंहिता लागली आहे. यामुळे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम करीत आहेत. यामुळे दोनही विभागाच्या अनागोंदीत शहरातील रस्त्यावर असलेल्या या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेकांना जखमी होण्याची वेळ येणार आहे. अनेकांना ऍन्टीरॅबीजचा डोस घ्यावा लागला आहे. हा प्रकार थांबावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात आली आहे.
शहरात 940 मोकाट श्‍वान
नगरपालिकेच्या वतीने या कामाकरिता शहरात केलेल्या सर्व्हेनुसार साधारणत: 940 मोकाट श्‍वान असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे. या श्‍वानांच्या नसबंदीकरिता तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च लागण्याची शक्‍यता त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात दर्शविली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. एका श्‍वानाच्या नसबंदीकरिता साधारण एक हजार रुपयांच्या दरम्यान खर्च येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनेनुसार वर्धा नगरपालिकेला तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण त्यांच्याकडून प्रस्ताव आला नसल्याने हे काम रखडले आहे. आता आचारसंहितेनरच मोकाट श्‍वानांचा बंदोबस्ताचे काम होण्याची शक्‍यता आहे.
- टेंभुर्णे,
जिल्हा नियोजन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या दबावात निर्णय: प्रकाश आंबेडकर;संघ मुख्यालयावर मोर्चाची केली घोषणा

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT