Professor
Professor 
विदर्भ

प्राध्यापकांचे मानधन दुप्पट

सकाळवृत्तसेवा

नागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर  काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला. यानुसार नव्या सेमिस्टरपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांना हे दर लागू करावे लागणार आहे. 

राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये बऱ्याच प्रमाणात प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विषयनिहाय शिकविण्यासाठी विद्यापीठातील विभाग आणि खासगी महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येते. यामुळे बरीच महाविद्यालये आणि विभागांमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक नेमण्यात आले आहेत. या प्राध्यापकांना एका तासिकेचे ३०० रुपये तर प्रात्यक्षिकांचे १५० रुपये मानधन मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून या मानधनात वाढ होत नव्हती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीएसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तासिका तत्त्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली होती. मात्र, उच्चशिक्षण विभागाकडून असा निर्णय न घेतल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांमध्ये नाराजी होती. त्यातूनच उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापकांच्या  मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. नव्या निर्णयानुसार तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाला  एका तासिकेचे ६०० रुपये तर प्रात्यक्षिकाचे २५० रुपये मानधन मिळणार आहे.

प्राध्यापकांसाठी अटी
 तज्ज्ञांच्या समितीमार्फत प्राध्यापकांची निवड करणे
 शिक्षकाच्या प्रमाणकानुसार शैक्षणिक भार देण्यात यावा
 नाहरकत प्रमाणपत्र घेणे, दुसऱ्या महाविद्यालयात काम न करणे
 दोन तासिकांसाठीच निवड
 जास्तीत जास्त नऊ महिन्यांकरिता कार्यभार देणे
 १०० रुपयाचे हमीपत्र भरून घेणे
 दरमहा वेतन अदा करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT