file photo 
विदर्भ

संत्राच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांना नफा; व्यापाऱ्यांच्या भावाला बळी पडू नये

आनंद चिठोरे

पथ्रोट (जि. अमरावती) : व्यापाऱ्यांच्या भावाला बळी न पडता संत्रा फळाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांनी नफा मिळवणे सुरू केले असून प्रत्येकच संत्रा उत्पादकांना हिंमत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सध्या संत्रा फळांच्या विक्रीचा व्यवसाय अत्यंत डबघाईस आलेला आहे.

बाजारपेठेत संत्रा फळांना भाव मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत असल्याने वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी हताश होऊन संत्र्याच्या वर्गवारीनुसार पाच ते दहा रुपयेपर्यंत संत्रा विकण्याची पाळी संत्रा उत्पादकांवर आलेली आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये डगमगून न जाता पूर्ण हिमतीने जनुना येथील शेतकरी साहेबराव थोरात व बंडू थोरात यांनी दिल्ली, बंगरुळ व पुणे येथील संत्रा बाजारपेठांचा अभ्यास करून स्वतः चा माल या बाजारपेठेत विक्रीसाठी नेला. त्या ठिकाणी त्यांना चाळीस रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळाल्याने त्यांनी केलेला प्रयोग यशस्वी ठरला.

पाचशे कॅरेटकरिता आला ७५ हजारांचा खर्च

त्यांना पाचशे कॅरेटकरिता गाडी भाडे साठ हजार रुपये तर संत्रा तोडणी व तो गाडीत भरणे याकरिता साधारणतः पंधरा हजार रुपये खर्च असा एकूण ७५ हजार रुपयांच्या जवळपास खर्च आला. २० ते २२ किलो संत्रा फळांचा एक कॅरेट त्याला चाळीस रुपये भावाप्रमाणे ८८० रुपये प्रती कॅरेट मिळालेला भाव नुसार ४ लाख ४० हजार रुपयांपर्यंत संत्रा विकला गेला.

तीन लाखांवर मिळाला नफा

८० हजार रुपयांच्या जवळपास आलेला खर्च वजा जाता तीन लाख साठ हजार रुपयेपर्यंतचा शुद्ध नफा स्वतः थेट विक्रीची हिंमत केल्यावर मिळाला. त्यांनी संत्रा फळांची वर्गवारी करून त्यावर बेस्ट क्वालिटीचे स्टिकर लावून पाचशे कॅरेटच्या गाडीप्रमाणे चार गाड्या आतापर्यंत या बाजारपेठेत नेल्या. इतरही संत्रा उत्पादकांनी अशी हिंमत करून थेट विक्री करून नफा मिळवावा, असे आवाहन केले आहे.


आम्ही हिंमतीने विकला संत्रा
बाजारपेठेत संत्र्याला भाव नसल्याची व्यापाऱ्यांकडून सारखी ओरड सुरू आहे. त्यामुळे ज्या भावात संत्रा घेतला तो सौदा अर्ध्यावरच सोडण्यात येत असल्याने आम्ही हे पाऊल उचलले.
- साहेबराव थोरात, संत्रा उत्पादक, जनुना




(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT