election propoganda vehicle
election propoganda vehicle 
विदर्भ

धावत्या वाहनातून प्रचार, नको रे बाबा! 

सकाळ वृत्तसेवा

चांदूरबाजार (जि. अमरावती) : धावत असताना प्रचार करणाऱ्या वाहनांवर निवडणूक भरारी पथकाने कारवाई केली व ही वाहने चांदूरबाजार पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. त्यामुळे धावत्या वाहनातून प्रचार करण्याची भीती उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात भरली आहे. 
निवडणूक आयोगाने निवडणूक शिस्तीत व्हावी याकरिता नियम लावलेले आहेत. यामध्ये वाहन एका जागेवर थांबवून प्रचार करणे बंधनकारक असताना ती वाहने धावताना प्रचार करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निवडणूक भरारी पथकाने अशा वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये सर्वपक्षीय वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधिताना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पुन्हा तेच वाहन धावत असताना प्रचार करीत असताना सापडल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे पथक प्रमुख ललित बोबडे यांनी सांगितले. 
या कारवाईमुळे काही वेळेपर्यंत प्रचार थांबला होता. तसेच आता वाहनचालक नियमानुसार प्रचार करीत असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसून येत आहे. ही कारवाई तालुक्‍यातील दोन भरारी पथकांनी संयुक्त केली असून, निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख ललित बोबडे व दुसऱ्या पथकाचे प्रमुख निखिल नागे यांच्यासह पोलिस शिपाई जयेश परिवाले, अमर जवंजाळ, वाहनचालक अशफाक भाई, श्रीवास व श्री. मोरे यांनी ही कारवाई केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT