नागपूर : प्रा. प्रदीप आगलावे यांच्या "धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन' ग्रंथाचे प्रकाशन करताना प्रा. अशोक गोडघाटे, डॉ. प्रकाश खरात, प्रा. अशोक गायकवाड व डॉ. सरोज आगलावे. 
विदर्भ

प्रा. आगलावे म्हणाले, बुद्ध धम्मात मानवी कल्याणाचा विचार 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर 6 : धर्माने स्वतःच्या गुणवत्तेवर जिवंत राहावे असे धम्माबाबत गौतम बुद्ध यांचे मत होते. बुद्धांनी भीती दाखवून धम्मप्रसार केला नाही. माणसाच्या कल्याणाचा विचार धम्मात असल्याने हा धम्म जगभर पसरला. छप्पनच्या धम्मक्रांतीतून हाच मानवी कल्याणाचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि समाजाच्या उत्थानाच्या दृष्टीने क्रांतिकारी परिवर्तन झाले, असे मत आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी व्यक्‍त केले. 
आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक आणि विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे यांच्या "धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन' या ग्रंथाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा रविवारी मोरभवन येथील मधुरम सभागृहात झाला. यावेळी प्रा. गोडघाटे बोलत होते. विचारपीठावर प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रकाश खरात, डॉ. अशोक गायकवाड (औरंगाबाद), लेखक डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे उपस्थित होते. 
डॉ. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून क्रांती घडवून आणली. त्यामुळे धर्मांतरित बौद्ध लोकांच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन घडून आले. त्या परिवर्तनाचे संशोधनात्मक विश्‍लेषण डॉ. प्रदीप आगलावे लिखित "धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन' या ग्रंथात केले आहे, असे डॉ. प्रकाश खरात म्हणाले. धम्मचक्र प्रवर्तनानंतरचा ऐतिहासिक असा दस्तऐवज म्हणजे हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी या भाषेमध्ये अनुवाद झाला आहे, असे डॉ. अशोक गायकवाड म्हणाले. संचालन डॉ. राहुल भगत यांनी केले. डॉ. सरोज आगलावे यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

SCROLL FOR NEXT