yoga 
विदर्भ

विलगीकरणात ते गिरवताहेत योगासन आणि स्वच्छतेचे धडे

सकाळवृत्तसेवा

सडक अर्जुनी (जि.गोंदिया) : तालुक्‍यातील पळसगाव-डव्वा येथील 20 कुटुंबे तेलंगणा राज्यातील खमंग जिल्ह्यात राजनपालन गावी रोजगारासाठी गेले होते. मात्र देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे रेल्वे, बससेवाही बंद झाली. रोजगारही बंद झाले. अशा परिस्थितीत तेलंगणात गेलेली मजूर कुटुंबे 4 मे 2020 ला आपल्या गावी परतली. विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून सरपंच तथा दक्षता समितीचे अध्यक्ष डॉ. भूमेश्वर पटले दररोज सकाळी योगा, प्राणायाम, अनुलोम-विलोम आदी व्यायामांचे धडे देत आहेत. 

तेलंगणातून मजूर पळसगावात परत आल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. त्यामुळे याची माहिती सरपंच डॉ. भूमेश्वर पटले यांनी तालुका प्रशासनाला दिली. गटविकास अधिकारी पी. डी. निर्वाण, सहाय्यक गटविकास अधिकारी एम. एस. खुणे, प्रभारी विस्तार अधिकारी (आरोग्य) लोकेश कटरे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे आरोग्य तज्ज्ञ भालचंद्र रहांगडाले, गट समन्वयक राधेश्‍याम राऊत आदी पळसगावात दाखल झाले. त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी व बाहेर राज्यातून आलेले मजूर यांच्याशी चर्चा करून सर्व मजुरांना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला. 

मजुरांना कोरोना विषाणूविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी 26 व्यक्तींना त्यांच्या राहत्या घरी व 33 व्यक्तींना शाळेत, इतर ठिकाणी अशा एकूण 59 स्त्री-पुरुषांना विलगीकरणात ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, विलगीकरणातील महिला-पुरुषांनी शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली आहे. विलगीकरणात आलेल्या व्यक्तींना गावकरी व ग्रामपंचायत प्रशासनाकडून गरजेच्या वस्तू देण्यात येत आहेत. यासाठी सरपंच पटले, उपसरपंच हिरालाल चवाडे, पोलिस पाटील शीला कुरसुंगे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबूलाल रंगारी, उपाध्यक्ष रामचंद्र राऊत, सचिव शरद चिमणकर, डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. देव चांदेवार आदी सहकार्य करीत आहेत. 

मास्क आवश्यक
आमच्या गावात प्रत्येकाला माक्‍सचे वाटप करण्यात आले आहे. विनामास्क गावात फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. "गाव कोरोनामुक्त करू' अशी शपथ देण्यात आली आहे. गावात सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत आहे. यासाठी गावकरी व आरोग्य विभागाचे सहकार्य मिळत आहे. 
- डॉ. भूमेश्वर पटले
सरपंच, अध्यक्ष दक्षता समिती, पळसगाव/डव्वा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT