file photo 
विदर्भ

गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यात यंदा पावसाने अनेक भागांत हाहाकार माजवला आहे. महिना उलटूनही पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुराचा सर्वाधिक फटका भामरागडसह गुंडूरवाही व पोयरकोटी येथील ग्रामस्थांना बसला असून घरातील जीवनावश्‍यक वस्तू पुरात वाहून गेल्याने पूरपीडितांपुढे उदरनिवार्हाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे.
पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्‍यात हाहाकार माजला आहे. पुरात जनावरे, अन्न-धान्य, कपडे, भांडे वाहून गेले तर तीनशेच्या जवळपास घरांचे पूर्णत: नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 7 सप्टेंबरला अचानक महापूर आल्यामुळे लोकांना अक्षरशः घर सोडून सुरक्षित ठिकाणी पळून जावे लागले. कित्येक लोकांनी रात्र उघड्यावरच काढली. पिण्याचे पाणी, अन्न तसेच आरोग्याची समस्या पूरग्रस्तांना भेडसावत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच मदतीसाठी उपाययोजना केल्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT