Rahul Gandhi
Rahul Gandhi 
विदर्भ

राहुल गांधींची 'शिवभक्ती'

सकाळवृत्तसेवा

वर्धा - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सेवाग्राम आश्रम परिसरात आल्यानंतर बेलाचे रोपटे लावून आपली "शिवभक्‍ती' पुन्हा प्रत्ययास आणून दिली.

राहुल गांधी यांचे सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी सेवाग्राम आश्रम परिसरात आगमन झाले. आल्यानंतर त्यांनी शांतिकुटीला भेट दिली. या वेळी सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. महात्मा गांधी यांचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई यांच्या कुटीसमोरील जागेत राहुल गांधी यांनी बेलाचे रोपटे लावले. या रोपट्याजवळ 32 वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीसुद्धा बेलाचे लावलेले झाड आहे. राजीव गांधी यांनी दोन ऑक्‍टोबर 1986 रोजी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी हे रोपटे लावले होते. अंतिम निवासजवळ सोनिया गांधी यांनी आवळ्याचे झाड लावले आहे. आठ वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांनी हे रोपटे लावले होते. त्यामुळे सेवाग्राम परिसरात राजीव गांधी, सोनिया गांधी व आता राहुल गांधी यांनी लावलेले झाडे झाली आहेत.

राहुल, सोनियांनी स्वतःचे ताट धुतले
सेवाग्राम परिसरात सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर राहुल गांधी, सोनिया गांधी व डॉ. मनमोहनसिंग यांनी शांतिभवनात भोजन केले. या वेळी कार्यकारिणीचे सदस्य व इतर जवळपास 100 जणांनी भोजन केले. आश्रम परिसरात भोजन केल्यानंतर स्वतःचे ताट स्वतःच धुण्याची प्रथा आहे. महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या स्वावलंबनाच्या प्रथेचे पालन या दोन्ही नेत्यांनी केले. भारतीय प्रथेप्रमाणे खाली बसून या नेत्यांनी भोजन केले. या प्रथेचे पालन सोनिया गांधी व राहुल गांधी यांनीही केले. भोजनानंतर या दोन्ही नेत्यांनी स्वतःचे ताट उचलले व ताट व वाट्या धुवून ठेवून दिल्या. इतर नेत्यांनीही या प्रथेचे पालन केले.

सामूहिक प्रार्थनेत सहभाग
बापू कुटी, बा कुटी व आदी निवासला भेट दिल्यानंतर राहुल गांधी, सोनिया गांधी व डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्वच बड्या नेत्यांनी बापू कुटीसमोर आयोजित सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. सुमारे पावणेबाराला सामूहिक प्रार्थनेला सुरवात झाली. प्रारंभी शोभा कवठकर व चमूने महात्मा गांधी यांची सामूहिक प्रार्थना गायिली. यानंतर कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांनी महात्मा गांधी यांचे आवडते भजन "वैष्णव जन ते तेने कहिए, जो पीड परायी जाने रे...' हे भजन गायिले. हे भजन गाण्यासाठी ते मध्य प्रदेशातील देवास येथून खास सेवाग्राम येथे आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT