विदर्भ

इच्छुकांच्या गर्दीतून राहुल ठाकरे दूर

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी झुंबड उडाली आहे. सात विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 66 जणांनी जिल्हास्तरावर अर्ज दाखल केले आहेत. ज्येष्ठ नेत्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच अर्ज पक्षाकडे दाखल झाले असले, तरी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांचा अर्ज नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात मोठा पराभव झाला. असे असले तरी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी कमी झालेली नाही. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात आज पक्षाचा एकाही विधानसभा मतदारसंघात आमदार नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी काही दिग्गज या गर्दीतून मागे राहिले आहेत. सात विधानसभा मतदारसंघांसाठी तब्बल 66 इच्छुकांनी जिल्हास्तरावर आपले अर्ज दाखल केले आहेत. पुसद विधानसभेसाठी एकमेव डॉ. मोहम्मद नदीम यांचा अर्ज आहे. उर्वरित सर्वच विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या दोन आकडी आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, वामनराव कासावार, विजय खडसे या नेत्यांसोबतच प्रवीण देशमुख, बाळासाहेब मांगुळकर, बाबासाहेब गाडे पाटील अशा अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. अनेक दिग्गजांच्या या यादीत गेल्या वेळी यवतमाळ विधानसभा निवडणूक लढविणारे राहुल ठाकरे यांचा अर्ज नसल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.
अर्ज न भरताही उमेदवारी
जिल्हा किंवा प्रदेशस्तरावर पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल न करताही काहींनी थेट दिल्लीहून उमेदवारी मिळविल्याचा इतिहास आहे. यवतमाळ, पुसद व दिग्रस या विधानसभा मतदारसंघात यापूर्वी असे घडले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, यावरच उमेदवारी अवलंबून असल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT