नागपूर : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना कवी राहुल वानखेडे; बाजूला अरुण गाडे व इतर.  
विदर्भ

राहुल वानखेडे म्हणाले, बाबासाहेबांच्या क्रांतिलढ्यातून प्रेरणा घ्या 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण पाईक आहोत. बाबासाहेबांनी हक्कासाठी प्रथम संघर्ष केला. नंतर संघटना बांधली. यामुळे त्या संघटना बलशाली बनल्या. बाबासाहेबांचे क्रांतिलढे प्रेरणा मानून कायद्याच्या चौकटीतून संघटितपणे वाटचाल करा, असे आवाहन सत्कारमूर्ती, आंबेडकरी कवी व विचारवंत राहुल वानखेडे यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी "मागासवर्गीयांचे हक्क आणि उपाययोजना' विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना वानखेडे बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अरुण गाडे होते. निवृत्त न्यायाधीश भारत चंद्रिकापुरे, सनदी लेखापाल अश्‍विन कापसे, भय्यासाहेब शेलारे, माया गुरभेले विचारपीठावर उपस्थित होत्या. 
"सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' या घोषणेतून आरक्षणासंदर्भात समाजात भ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे न्यायाधीश भारत चंद्रिकापुरे म्हणाले. अश्‍विन कापसे यांनी मागासवर्गीय समाजाने आर्थिक विकास साध्य करून आंबेडकरी चळवळ बळकट करावी असे सांगितले. भय्यासाहेब शेलारे यांनी आरक्षणाचा हक्क हा मागासवर्गीयांचा मूलभूत हक्क असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT