hospital.jpg
hospital.jpg 
विदर्भ

डॉक्टर नांदेडवासी, रेल्वेची आरोग्यसेवा ‘व्हेंटीलेटरवर’

शुभम बायस्कार

अकोला : लाखो रुपये खर्चून रेल्वे प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले दक्षिण मध्य रेल्वेचे आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी पांढरा हत्ता ठरले आहे. नियुक्त करण्यात आलेले पुरुष डॉक्टर ‘नांदेडवासी’ झाल्याने चकाचक असलेले रुग्णालय सध्या अधीक्षिकेच्या भरवशावर आहे. परिणामी येथे उपचारासाठी येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची वाताहत होत असूनही या गंभीर प्रश्नाकडे रेल्वेच्यावतीने सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.


दक्षिण मध्यरेल्वेचे अतिसंवेदनशील आणि तेवढेच महत्वाचे असलेले अकोला रेल्वे स्थानक म्हणजे पश्चिम आणि पुर्व विदर्भाला कनेक्ट करणारे रेल्वे स्थानक आहे. दरदिवशी 35 हजारांहून अधिक प्रवाशांची या मार्गावर वर्दंड असते. सुपरफास्ट तर 20 पर्यंत मध्यमगतीच्या रेल्वेगाड्या या स्थानकावरून धावतात. दरदिवसाला जवळपास 4 कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वे विभागाला मिळते. याच प्रवाशांची धावत्या ट्रेनमध्ये प्रकृती बिघडल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावा यासाठी येथील मध्यरेल्वेच्या परिसरात केंद्रीय रेल्वे प्रशासनाने चांगल्या सोई-सुविधांचे आरोग्य केंद्र उभारले आहे. त्याठिकाणी रुग्णवाहिकेसह 8 कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले.

मात्र येथील डॉक्टर हे नियमीत कर्तव्यावर उपस्थित राहत नसल्याने इतरही कर्मचारी दांड्या मारतात. शनिवारी (ता.16) या आरोग्य केंद्राची पाहणी केली असता, येथील कारभार केवळ आणि केवळ अधीक्षिकेवर येऊन ठेपल्याचे दिसून आले. त्यामुळे आजारी रुग्णांना कसल्या प्रकारची ट्रिटमेट मिळत असेल हा संशोधनाचा विषय आहे. याकडे दक्षिण मध्य रेल्वेच्या हॉस्पिटल विभागाने लक्ष देऊन नियमीत डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

दवाखाना आहे चिकित्सक नाहीत!
दै.‘सकाळ’ने रेल्वेच्या आरोग्य केंद्राची सकाळी 10.30 वाजता पाहणी केली. त्यावेळी आरोग्य केंद्र दिसून आले आहे. मात्र डॉक्टर दिसून आले नाहीत. सफाई कामगार, औषध निर्माण अधिकारी यासह महिला अधीक्षक असे तीनच कर्मचारी आढळले. येथे सहमंडळ चिकित्सक म्हणून नियुक्त करण्यात आलेले डॉ.नवीन कुमार हे कर्तव्यावर उपस्थित नव्हते. यासंदर्भातील माहिती घेतली तेव्हा ते नांदेड येथे असल्याचे सांगण्यात आले. परिणामी येथे कुणीही डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

हा विषय माझ्या अखत्यारित नाही
आरोग्य केंद्राचा विषय माझ्याकडे येत नाही. नांदेड येथील रेल्वेच्या हॉस्पिटल विभागाकडे हा विषय येते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करावा.
-डी.एम.खापेकर, स्टेशन प्रबंधक, दक्षिण मध्यरेल्वे, अकोला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT