नागपूर :  शनिवारी खऱ्या अर्थाने पावसाने उपराजधानीला चिंब केले. दुपारनंतर मेघ दाटून आले आणि रात्री उशिरापर्यंत अधूनमधून सरी कोसळत होत्या. पावसामुळे झाशी राणी चौकात असे पाणी साचले होते. उशिरा का होईना वरुणराजा प्रसन्न झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दि
नागपूर : शनिवारी खऱ्या अर्थाने पावसाने उपराजधानीला चिंब केले. दुपारनंतर मेघ दाटून आले आणि रात्री उशिरापर्यंत अधूनमधून सरी कोसळत होत्या. पावसामुळे झाशी राणी चौकात असे पाणी साचले होते. उशिरा का होईना वरुणराजा प्रसन्न झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दि 
विदर्भ

पावसाचे नागपूरकर सुखावले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारी दमदार हजेरी लावली. दुपारी रामदासपेठ, मानेवाडा, बेसा, नंदनवन, सदर, गोधनी, वाडी, दिघोरी, नारीसह शहरात सर्वदूर पाऊस धो-धो बरसला. हवामान विभागाने विदर्भात रविवारपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत विलंबाने एंट्री घेणाऱ्या मॉन्सूनने औपचारिक हजेरी लावत उसंत घेतली. शनिवारपासून अपवाद वगळता आठवडा कोरडा गेला. जून महिना संपत आल्याने शेतकऱ्यांसह नागपूरकर पावसाची वाट बघत होते. शनिवारी वरुण राजाने नागपूरकरांची इच्छा पूर्ण केली. विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाने हजेरी लावल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी आडोशाला उभे राहून पावसापासून स्वत:चा बचाव केला. बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा हट्ट पूर्ण केला. बच्चेकंपनी घरांच्या गच्चीवर आणि रस्त्याने जलधारा अंगावर घेतानाचे चित्र दिसून आले. दोन ते अडीच तासांपर्यंत कोसळलेल्या पावसामुळे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले.
अनेक भागांमध्ये सायंकाळनंतरही अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती. दिवसभरात 10 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्याच दमदार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते. सीताबर्डीतील उड्डाणपुलावर चांगलेच पाणी साचले होते. त्यावरून भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे पाणी पुलाखालून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर कोसळत होते. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT