rajiv gandhi student protection scheme 88 case approve shegaon Sakal
विदर्भ

Shegaon : विद्यार्थी अपघात योजनेचे प्रस्‍ताव रखडले; जिल्ह्यात ८८ प्रकरणे मंजूर; दप्तर दिरंगाईचा फटका

विद्यार्थ्यांचा अपघात झाला, मोठी जटील शस्त्रक्रिया करावी लागली किंवा अपघाती वा गंभीर आजाराने मृत्यू झाला तर राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून त्‍याच्‍या पालकांना अनुदान देण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

- अमर बोरसे

शेगाव : विद्यार्थ्यांचा अपघात झाला, मोठी जटील शस्त्रक्रिया करावी लागली किंवा अपघाती वा गंभीर आजाराने मृत्यू झाला तर राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून त्‍याच्‍या पालकांना अनुदान देण्यात येते.

मात्र, सन २०२१ पासून बुलडाणा जिल्ह्यातील ८८ मंजूर लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नसल्याचे वास्‍तव असून, प्रशासनाच्या या दप्तर दिरंगाईचा फटका त्‍यांना बसला आहे. त्‍यामुळे हे अनुदान तत्‍काळ मिळावे अशी मागणी होत आहे.

इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत आलेले प्रस्ताव सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंजूर करून शासनाकडे पाठवते.

बुलडाणा जिल्ह्यात सन २०२१ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा शिक्षण कार्यालयात एकूण ८८ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. त्यावर समितीची बैठक होऊन सर्वच्या सर्व प्रस्ताव मंजूर देखील करण्यात आले आहेत. परंतु, वारंवार मागणी करून देखील बुलडाणा जिल्ह्याला गेल्या तीन वर्षांपासून अद्यापपर्यंत अनुदानाची प्रतीक्षाच आहे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत राबविली जाते. गतवर्षी या योजनेतील सानुग्रह अनुदानात वाढ करण्यात आली असून, अपघात झाल्यानंतरच्या ठराविक कालावधीत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास पालकांना दीड लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळते.

जिल्ह्यातील विविध दुर्घटनेत मृत्यू व जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून शाळांनी पाठविल्यानंतर जिल्हा समितीच्या बैठकीत मंजूर करून सानुग्रह अनुदानाची शिफारस केली आहे. परंतू या योजनेचे अनुदान शासनाकडून देण्यात येत नसल्याने योजनेला घरघर लागली आहे.

अशी मिळते मदत...

अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. कायमचे अपंगत्व आल्यास ७५ हजार रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत देण्यात येते. शस्त्रक्रिया करावी लागल्यास १ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळण्याची तरतूद आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील ८८ विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव शासनाच्या लालफीतशाहित अडकले असून, यामुळे ही योजना कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. परंतु शासनाने विद्यार्थी हितासाठी रखडलेल्या सर्व प्रस्तावांचे अनुदान वितरित करावे.

- उमेश शेळके, तालुकाप्रमुख, युवासेना शेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT