file photo
file photo 
विदर्भ

राजुराच्या तळीराम पोलिसांना तेलंगणात चोप

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : राजुरा पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांनी शेजारच्या तेलंगणा राज्यात दारू पिऊन धुडगूस घातला. या दोघांनाही तेलंगणा पोलिसांसमोरच तिथल्या नागरिकांनी चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलाच फिरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे तळीराम शेजारच्या तेलंगणात जाऊन आपली तहान भागवितात. राजुरा तालुक्‍याला लागूनच तेलंगणाची सीमा आहे. सीमेपासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर तेलंगणातील दारूची दुकाने आहेत. तेलंगणा पोलिसांनी राज्यातील दारू महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी तिथे चौकी उभारली आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचे सत्रसुद्धा तिथे राबविले जाते. त्याउपरही तिथे जाणाऱ्या तळीरामांची संख्या मोठी आहे. राजुरा पोलिस ठाण्यात नुकतेच पोलिस उपनिरीक्षक म्हणून गोमलाडू रुजू झाले आहेत. ते दोन शिपायांना घेऊन गुरुवारी (ता.8) तेलंगणात गेले. तिघांनीही यथेच्छ दारू प्याली. परतीच्या प्रवासात तिघेही एका ठिकाणी थांबले. दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने गोयगाव येथे नाका आहे. तेथे मालवाहू ट्रक थांबतात. तिथे जाऊन या तिघांनीही ट्रकचालकांशी हुज्जत घातली. यातील काही ट्रकचालकांनी तेलंगणा पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर लगेच तेलंगणाचे पोलिस तिथे पोहोचले. मात्र, या तळीराम पोलिसांचा धुडगूस सुरूच होता. मद्यधुंद अवस्थेत त्यांना साधे उभेही राहता येत नव्हते. तरीही ते समोरील लोकांशी वाद करीत होते. त्यावेळी काही जणांनी याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. व्हिडिओमध्ये पोलिसांनी मारहाण केली आणि पैसे हिसकाविल्याचे ट्रकचालक सांगत आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तेलंगणा पोलिसांनी या तिघांनाही गाडीत बसविण्याची कारवाई सुरू केली. त्याचवेळी तिथे उपस्थित नागरिकांचा संयम सुटला आणि तिघांनाही चांगलाच चोप दिला. सध्या तिघेही तेलंगना पोलिसांच्या ताब्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT