shetakri sanghtana 
विदर्भ

वर्धेच्या खासदारांच्या घरासमोर होणार राखरांगोळी; शेतकरी संघटना करणार अनोखे आंदोलन

मनोज रायपुरे

वर्धा : कांदा निर्यात बंदीच्या विरोधात जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. 24) खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर वर्धा येथे राख-रांगोळी आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून सरकारला निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास भाग पाडावे, याकरिता हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उल्हास कोटमकर यांनी दिली.

शेतकऱ्यांनी गेली सहा महिने कांदा कवडीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरून निघेल, असे भाव मिळू लागले आहे. मात्र, केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदी करुन कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचेच नव्हे तर देशाचे आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या प्रपंचाची राखरांगोळी केली आहे. शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करावयाचे असते, परंतु ते त्यांचे कर्तव्य विसरले आहे.

गुरुवारी खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर केंद्र शासनाने काढलेल्या कांदा निर्यातबंदी आदेशाची प्रत जाळून राख करून कांद्याची रांगोळी काढली जाईल. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य मधुसूदन हरणे, प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, जिल्हाध्यक्ष उल्हास कोटमकर, युवाध्यक्ष अरविंद राऊत, गणेश मुटे, तालुकाध्यक्ष मुकेश धाडवे, कार्याध्यक्ष प्रमोद तलमले यांनी केले आहे. 

संपादन : सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

Latest Marathi News Live Update : 25000 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT