कन्हान ः महिला बचतगटाने तयार केलेले मेणाचे दिवे 
विदर्भ

रमाई बचतगट होतोय स्वयंदीप 

सुनील सरोदे

ः कन्हान (जि.नागपूर) :  दिवाळी तोंडावर आली. दिव्यांचा, प्रकाशाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. बाजारात रंगीबेरंगी दिव्यांनी दुकाने सजलेली आहेत. मात्र स्वयंनिर्भरतेचा ध्यास ग्रामपंचायत वराडाअंतर्गत येणाऱ्या वाघोली येथील रमाई स्वयं साहाय्यता महिला बचतगटाने घेतला असून त्यांनी मेणाचे रंगीबेरंगी सुरेख दिवे तयार करून बाजारात आणले आहेत. या दिव्यांना अतिशय मागणी असल्याने बचतगटातील महिला या स्वयंरोजगारातून सक्षम होत आहेत. 
सध्याच्या काळात महिला कुटुंबाला सक्षम करण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी धडपडत आहेत. यातून केवळ कुटुंब नव्हे तर अख्खा समूह "स्वयंदीप' होत आहे. सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्रामपंचायत वराडाच्या वाघोली गावात स्थापन करण्यात आलेल्या रमाई स्वयं साहाय्यता महिला बचतगटाने मेणाचे रंगीबेरंगी सुरेख दिवे तयार करून बाजारात आणले आहेत. या दिव्यांना बाजारात चांगली मागणी असल्याने गटातील महिला अध्यक्ष प्रतिभा अमित पौनिकर, सचिव आरती राजू मेश्राम, सदस्या सविता खोब्रागडे, संगिता पौनिकर, ओजंता पाटील, संघमित्रा वासनिक, ललिता उईके, मीना काकडे, सीता भोंडे, इंदू गजभिये या स्वयंरोजगारातून सक्षम होत आहेत. या गटाकरिता ग्रामपंचायत सदस्य राकेश काकडे, इंदूबाई गजभिये, ग्रामप्रेरक रूपेश चरडे यांनी सहकार्य केले. महिला गटाचे मेणाचे दिवे अतिशय सुरेख असून नागरिकांनी खरेदी करून सहकार्य करावे, असे आवाहन रमाई महिला बचतगटाच्या अध्यक्ष प्रतिभा पौनिकर, सचिव आरती मेश्राम यांनी केले आहे. ग्रामपंचायत वराडाच्या सरपंच विद्याताई चिखले, उपसरपंच उषाताई हेटे, सर्व सदस्य व ग्रामसचिव निर्गुण शेळकी यांनी रमाई महिला बचतगटाच्या महिलांच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT