विदर्भ

मजुराच्या मुलीवर शाळा संचालकाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुराच्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन एका नामांकित शाळेच्या संचालकाने बलात्कार केला तर तिच्या लहाण बहिणीशी अश्‍लील चाळे केले. हा सर्व प्रकार दोन्ही मुलींच्या आईच्या संगनमताने आरोपीने केला. त्यामुळे आरोपीसह मुलीच्या आईविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही दुर्दैवी घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली. अशोक जयस्वाल (वय 50, रा. स्वामीनारायण मंदिराजवळ, वाठोडा) असे शाळा संचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शिवनी गावातील एक दाम्पत्य नागपुरात कामधंद्याच्या शोधात आले होते. त्यांना खरबीतील नामांकित इंग्रजी शाळेचा संचालक अशोक जयस्वाल यांच्या वाठोड्यातील शेतावर काम मिळाले. जयस्वालचे वाठोड्यातील शेतावर फार्महाउस आहे. येथे दोघेही दाम्पत्य 17 आणि 15 वर्षांच्या दोन मुलींसह राहत होते. जयस्वालची वाईट नजर शेतमजुराच्या पत्नीवर गेली. त्यामुळे त्याने दर रविवारी फार्मवर येणे-जाणे सुरू केले. दरम्यान, त्याने कामावरून काढून टाकण्याची धमकी आणि पैसे देण्याचे आमिष दाखवून शेतमजुराच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. दारुडा असलेल्या जयस्वालची नजर शेतमजुराच्या मोठ्या मुलीवर गेली. अशोक जयस्वाल याने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शेतमजुराला मध्य प्रदेशात पाठवून दिले तर त्याच्या पत्नीला व मुलींना फार्महाउसवर ठेवले. त्याने तिच्या आईला जाळ्यात ओढून मुलीला शारीरिक संबंधासाठी तयार करण्यासाठी दबाव टाकला. त्यासाठी पैसे आणि कपडे देण्याचे आमिष मुलीच्या आईला दिले. गेल्या दोन वर्षांपूर्वी ऑक्‍टोबर 2016 मध्ये पहिल्यांदा मोठ्या मुलीवर अशोक जयस्वालने बलात्कार केला. त्यावेळी तिची आई घराबाहेर पहारा देत बसली होती. अशाप्रकारे जयस्वाल वाट्टेल तेव्हा फार्महाउसवर येऊन मुलीवर बळजबरी करायचा तर आईशीही संबंध ठेवायचा. तब्बल तीन वर्षे लैंगिक अत्याचार सहन केल्यानंतर अशोक जयस्वालच्या पापाचा घडा फुटला. मुलीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अशोक जयस्वाल आणि मुलीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT