Greay Flower
Greay Flower 
विदर्भ

दुर्मिळ विदेशी ग्रे-प्लॉवरचे अमरावती शहरालगत आगमन

सुधीर भारती

अमरावती ः शहरालगतच्या तलावावर राखी चिखल्या अर्थात ग्रे-प्लॉवर हा विदेशी पक्षी आढळून आला आहे. शहरातील वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत निकम पाटील, संकेत राजूरकर, शशांक नगराळे  कौशिक तट्टे यांनी आपल्या नियमित पक्षीनिरीक्षणादरम्यान या एकटा आलेल्या हिवाळी पाहुण्या पक्ष्याची दुर्मिळ नोंद घेऊन छायाचित्रे टिपली.

‘प्लुवायलीस स्क्वाटारोला’ असे शास्त्रीय नाव असणाऱ्या या पक्ष्याची विदर्भातील ही महत्त्वपूर्ण नोंद असून हा पक्षी भारतात हिवाळी स्थलांतर करून पूर्व आणि पश्‍चिम समुद्र किनारपट्टीवर उतरतो. परंतु हा पक्षी थव्यापासून वेगळा आणि एकटा पडून भटकला असावा, असा अंदाज आहे. एप्रिल ते जुलै दरम्यान विणीच्या हंगामात तो आर्टिक खंड, अलास्काचा उत्तरी समुद्रतट, कॅनडा तसेच रशिया या देशांतील हवामानाशी जुळवून घेतो. लांब पल्ल्याच्या स्थलांतरणासाठी हा पक्षी विशेष प्रसिद्ध आहे.

मध्यम आकाराच्या या पक्ष्याची लांबी साधारणपणे २८ ते ३१ सें.मी. असून, पंख पसरवलेल्या अवस्थेत पंखांची लांबी ७० ते ८० सें.मी. भरते. पांढुरक्‍या राखडी रंगाच्या अंगावर काळे एकसमान ठिपके आणि काळी चोच व काळे पाय असणारा नर पक्षी विणीच्या हंगामात मात्र चोचेखालून छाती आणि पुढे पोटापर्यंत आकर्षक काळा रंग धारण करतो. त्यावेळी त्याचे पंख सुद्धा किंचित सोनेरी छटा धारण करतात. चोच मानाने जरा आखूड असली तरी मजबूत असते. 

समुद्रीतटाचा उथळ प्रदेश आणि पाणवठ्यावरील किनाऱ्याचा उथळ चिखलपट्टा यामध्ये सकाळच्या वेळी अन्न शोधताना याची लगबग बघण्यासारखी असते. मुख्यतः मांसाहारी असणारा हा पक्षी काही प्रमाणात शाकाहार सुद्धा करतो. पानथळीत आढळणारे छोटे कीटक, मृदुकाय शिंपले आणि कृमी असे याचे खाद्य आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT