garlic 
विदर्भ

कोरोनाने केले जेवणातील या पदार्थाचे भावही दुप्पट 

राजेश काळे

राळेगाव (जि. यवतमाळ) : कोरोनाचा संसर्ग हा फार चिंतेचा विषय आहे. या संसर्गाच्या भितीपोटी सुरू असलेला काळाबाजार हा अधिक चिंतेचा विषय झाला आहे. किराणा मालापासून जीवनावश्‍यक वस्तूही आता जादा दाम देऊन विकत घेण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. साधे लसणाचेच उदाहरण घेतले तर भावात दुप्पट वाढ झाली असून विक्रीतही वाढ झाली आहे. 

कांदा व लसूण हे दोन्ही घटक भाजीची चव वाढविणारे आहेत. शिवाय, या दोन्ही घटकांत औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे ते अनिवार्य घटक आहेत. कांदा व लसून वापरल्याशिवाय भाजी केली जात नाही. कोरोनामुळे लोकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, अशा लोकांना कोरोनाची लागण होत नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदानुसार आवश्‍यक असलेल्या भाज्या, वस्तूंचा वापर केला जात आहे.

औषधी गुणधर्म असलेला घटक

लसूण हा औषधी गुणधर्म असलेला घटक असल्याने व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त असल्याने लसणाचा वापर वाढला आहे. तसेच 'लॉकडाउन' वाढल्यास लसूण मिळणार की नाही अशी चिंता असल्याने लोकांनी लसणाचा स्टॉकही करून ठेवला आहे. त्यामुळे लसणाची विक्री तिप्पट वाढल्याचे स्थानिक भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. तर, लसणाच्या विक्रीसोबतच त्याची किरकोळ किमत तिप्पट झाल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. नागरिकांनी भाजीपाला खाणे कमी केले आहे. लसूण ही सर्व भाज्यांमध्ये आवश्‍यक असलेला घटक आहे. त्यामुळे लसणाचा वापर वाढला आहे.

भाव १५० रुपये प्रतिकिलो

टिव्ही रेडिओ वर्तमानपत्रांमधूनही लसण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे सांगितले जाते, त्यामुळे लसूण खाणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. सध्या राळगाव येथे लसूण एकशे चाळीस रुपये प्रतिकिलो आहे. हेच भाव काही दिवसांपूर्वी दोनशे रुपये पार गेले होते. ग्राहकांची मागणी पाहता भाजीविक्रेतेसुद्धा ज्यादा भाव घेऊन लसूण विकत आहेत. हा लसून निघण्याचां काळ असून साधारणपणे यावेळी लसून 50 रुपये प्रतिकिलो असतो. परंतु, कोरोनाच्या संकटाचा फायदा व्यापारी घेत असून लसून 150 रुपयांपेक्षा जास्त भावाने विकला जात आहे. शासनाने याबाबत निर्णय घेऊन सामान्य नागरिकांची सुरू असलेली लूट थांबविली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

कोरोनाच्या आड व्यापाऱ्यांचे चांगभले 

राळेगाव येथे लसूण व आलू बाहेरून मागविले जात होते. तेव्हा भावावर नियंत्रण होते. आता बाहेरचा माल येणे बंद झाले. त्याचा फायदा काही व्यापारी घेत आहेते. दुप्पट भावात लसून विकले जात आहे. कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे चांगभले होत आहे. 

लसणात औषधी गुणधर्म आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी लसूण गुणकारी आहे. त्यामुळे आहारात लसणाचा वापर वाढला आहे. मात्र, लसणाची किंमत वाढल्याने गृहिणींचे बजेटही वाढले आहे. तिच स्थिती भाजीपाला व किराणा वस्तुंची आहे.' 
-भाग्यश्री कावलकर, 
गृहिणी, राळेगाव जि. यवतमाळ. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT