Raver Loksabha Constituency BJP  esakal
विदर्भ

Raver Loksabha Election : भाजपाचा बालेकिल्ला शरद पवारांची राष्ट्रवादी भेदणार का?

रावेर लोकसभा निवडणूक मतदारसंघातील आजपर्यंतच्या लढतींवर एक नजर

​विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा - स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा १९५२ ला भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात पूर्वीचा जळगाव व आता पुनर्रचनेनंतर झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासाची पाने चाळली असता काँग्रेस व त्या विचारसरणीच्या पक्षाचे सुरुवातीला वर्चस्व राहिले होते.

नंतर मात्र १९९० ते २०१९ या २८ वर्षाच्या कार्यकाळात एक वर्षाचा अपवाद सोडला तर भाजपाने वापसी करत या मतदारसंघावर आपले प्राबल्य सिद्ध केले असल्यामुळे आता होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाचा आता असलेला हा गड राष्ट्रवादी भेदणार की रक्षा खडसे हॅट्रिक साधणार हे निवडणुक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर रावेर लोकसभा तेव्हाच्या जळगाव मतदारसंघात स्व. मधुकरराव चौधरी, जे.टी महाजन यांच्या काळापासून व त्यापूर्वी काँग्रेसचा दबदबा कायम होता. मात्र कालांतराने या भागात भाजप-जनसंघांने हळूहळू पाळेमुळे घट्ट करत १९९१ मध्ये हा मतदारसंघ डॉ. गुणवंतराव सरोदेच्या विजयश्रीतून पहिल्यांदा ताब्यात घेतला.

त्यांनी काँग्रेसचे जे. टी. महाजन यांचा पराभव करत पहिल्यांदा कमळ फुलविले. १९९६ च्या निवडणुकीतही हीच लढत होऊन दुसऱ्यांदा सरोदे विजयी झाले. १९९६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत आले व १३ दिवसात सरकार कोसळल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या.

त्यावेळी मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघ व आताचा रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे डॉ. गुणवंतराव सरोदे यांचा काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांचेकडून पराभव झाला व डॉ. गुणवंतराव सरोदे यांची हॅट्रिक हुकली. त्यावेळी केंद्रात भाजपची सत्ता आली व तेव्हा सुद्धा १३ महिन्यात हे सरकार कोसळले. हा १३ महिन्याचा कार्यकाळ वगळता त्यानंतर काँग्रेसला या मतदारसंघात यश आले नाही.

वीस वर्षात आघाडीच्या हाती उपेक्षाच

सन १९९९ ते २०१९ या वीस वर्षात ही जागा राष्ट्रवादीने १९९९, २००७, २००९ व २०१४ अशी चार वेळा तर काँग्रेसने १९९९, २००४ व २०१९ अशी तीन वेळा लढली आहे. मात्र उमेदवार आलटून पालटून बदलले मात्र यश प्राप्त झाले नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुन्हा ताकद लावून पाचव्यांदा श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीतून ताकद आजमिविण्याची तयारी सध्या सुरू केली आहे.

सन १९९९ पासून भाजपा अपराजीत

१९९९ मध्ये काँग्रेसचे उल्हास पाटील व २००४ च्या निवडणुकीत काँग्रेचेच जे. टी. महाजन यांचा पराभव करून भाजपाचे डॉ. गुणवंतराव सरोदे निवडून आले. २००७ च्या पोटनिवडणुकीत मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली असता डॉ. अर्जुन भंगाळे यांचा पराभव करून भाजपाचे हरिभाऊ जावळे दिल्लीवारीवर गेले.

२००९ मध्ये या मतदारसंघाची रावेर लोकसभा अशी पुनर्रचना करून विदर्भातील मलकापूर विधानसभेची जोड या मतदारसंघाला देण्यात आली. तेव्हा पण भाजपाचे हरिभाऊ जावळे यांनी राष्ट्रवादीचे रवींद्र भैया पाटील यांना पराभूत केले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र भाजपाने हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापून रक्षा खडसे यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली.

२०१४ व २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी अनुक्रमे राष्ट्रवादीचे मनीष जैन व काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पराभूत करत सलग दोन वेळा त्या रावेरच्या खासदार बनल्या असून तिसऱ्यांदा आता होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांचेसोबत त्यांची लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT