Ravi Rana and Ravi rana esakal
विदर्भ

Navneet Rana: 'रवी राणांनीच पत्नीला घात करून लोकसभेत पाडलं..' शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट ! अमरावतीचं राजकारण का पेटलं!

abhijit adsul: १५ दिवसांत राज्यपालपद दिलं नाही तर नवनीत राणांच्या जातप्रमाणपत्रावरून कोर्टात आव्हान करणार असल्याचा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला होता.

Sandip Kapde

अमरावतीत आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्पत्य वाद चांगलाच पेटला आहे. लोकसभेत पराभव झाल्यानंतर नवनीत राणा सक्रिय झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आनंदराव अडसूळ यांना शिंदे फडणवीसांनी राज्यपालपदाचं आश्वासन दिलं होतं. मात्र, भाजप नेते हरीभाऊ बागडे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे अडसूळ नाराज आहेत.

जात प्रमाणपत्रावरून वाद

१५ दिवसांत राज्यपालपद दिलं नाही तर नवनीत राणांच्या जातप्रमाणपत्रावरून कोर्टात आव्हान करणार असल्याचा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला होता. नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं भाष्य माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी केलं. यासंदर्भात सुप्रिम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचंही अडसूळ यांनी म्हटलं.

रवि राणा यांच्या आरोपांवरून राजकारण पेटलं

यानंतर अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांनी आम्हाला अनेकदा ब्लॅकमेल केल्याचा आरोप आमदार रवि राणा यांनी केला. यानंतर राजकारण चांगलंच पेटलं. आता आनंद अडसुळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अभिजीत अडसूळ यांचा हल्लाबोल

अभिजीत अडसूळ म्हणाले, "आनंदराव अडसूळ यांना अमित शहा यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिला होता, मात्र तो शब्द पाळला गेला नाही. शिवसेनेने दोन राज्यपाल पद देण्याचे आश्वासन दिले होते. दोन वर्ष झाली त्याला, मात्र रवि राणा वाचाळ बोलतात. राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं."

राणा यांच्यावर गंभीर आरोप

अभिजीत अडसूळ यांनी आरोप केला की, "जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत राणा यांचे चांगले संबध नाहीत. महायुतीत खडा टाकण्याचं काम रवी राणा करत आहेत. शिवसेनेच्या नेत्याबाबत आर्वाच्च बोलणं योग्य नाही. खोटी प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वासघात केला. जनतेने त्यांना जागा दाखवली. आनंदराव अडसूळ हे महायुतीचे नेते आहेत. आमच्या नेत्याबाबत अशी भाषा वापरली जात असेल तर युतीत रहायचं की नाही हाही विचार करावा लागेल."

महायुतीतून हकालपट्टीची मागणी

"राणांचा इतिहास पाहा, सत्तेत जो पक्ष असतो त्या पक्षाचे नेते यांचे देव असतात. बच्चू कड्डू हे रवी राणांमुळे महायुतीतून दूर गेलेत. राणांना महायुतीतून बाहेर काढा अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का हे तरी सांगा. ब्लॅकमेलिंग करणं हे आमच्या रक्तात नाही. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं, मात्र आमच्या नेत्याबद्दल बोलवून आमचा स्वाभिमान दुखावला जात असेल तर नक्कीच याचा विचार केला जाईल," असे अभिजीत अडसूळ यांनी सांगितले.

रवी राणा यांना 'छपरी' संबोधले

महायुतीतील नेत्यांवर छपरी आमदार अपमान कारक बोलत असतील तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल, असे अभिजीत अडसूळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT