Read write campaign in the state soon 
विदर्भ

राज्यात लवकरच 'पढना-लिखना अभियान'

प्रवीण खेते

अकाेला : राज्यातील १५ वर्षापेक्षा जास्त वयाेगटातील निरक्षर महिलांना साक्षर करण्याच्या उद्देशाने लवकरच ‘पढना लिखना अभियान’ राबविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे १५ वर्षापेक्षा जास्त वयाेगटातील महिलांना शिक्षणाची दारे नव्याने उघडणार आहेत.

देशात साक्षरतेचा दर वाढत असला तरी निरक्षरांची संख्याही कमी नाही. अशा निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे ‘पढना लिखना अभियान’ राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्यातही ‘पढना लिखना अभियान’ सुरू करण्याचा मानस राज्याचे शिक्षण संचालक यांनी शुक्रवारी पुण्यात आयाेजित एका बैठकीत व्यक्त केला. असे झाल्यास राज्यातील १५ वर्षापेक्षा जास्त वयाेगातील निरक्षर महिलांना शिक्षणाची दारे नव्याने उघडतील. परंतु, तत्पूर्वी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रौढ शिक्षण कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चार जिल्ह्यात प्रौढ शिक्षण सुरू

एका सर्वेक्षणानुसार देशातील अविकसीत जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली हाेती. त्यामध्ये राज्यातील उस्मानाबाद, गडचिराेली, नंदूरबार आणि वाशीम या चार जिल्ह्यांचा समावेश हाेता. या अंतर्गत चारही जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी १५ वर्षापेक्षा जास्त वयाेगटातील निरक्षर महिलांना साक्षर करण्याची माेहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्याची साक्षरता (२०११ नुसार)
पुरुष - ९२.३४ टक्के
महिला - ८३.५४ टक्के
एकूण - ८८ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

SCROLL FOR NEXT