विदर्भ

मतपत्रिकेवर निवडणुकीसाठी आमचीही तयारी : आठवले

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : ईव्हीएमवर निवडणुकीचा निर्णय कॉंग्रेसच्याच कार्यकाळात झालेला आहे. पराभवामुळे विरोधकांनी आता ईव्हीएमला विरोध करीत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. मतपत्रिकेवर निवडणुकीसाठी आमचीही तयारी आहे, निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असे मत आज केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चा विदर्भ प्रदेश महामेळाव्यासाठी ते नागपुरात आले होते. त्यानंतर रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कार्यामुळे जनतेने त्यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागांवर यश मिळवून दिले. विरोधक मोदींच्या मागे लागले होते. त्यात अपयश आल्यानंतर आता ईव्हीएमच्या मागे लागले, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला. छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशात निवडणूक जिंकली, त्यावेळी ईव्हीएम सदोष नव्हत्या काय? असा सवालही त्यांनी कॉंग्रेसला केला. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने प्रत्येकी 135 जागा घ्यावा, 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्या. यातील 10 जागांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली असून चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. युती झाल्यास किमान 240 जागा जिंकणार, असा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT