Recruitment for police in Maharashtra said Anil Deshmukh  
विदर्भ

गृहमंत्र्यांकडून पोलिस भरतीचा संभ्रम दूर; दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी नंतरच लेखी परीक्षा

राजकुमार भितकर

यवतमाळ : राज्यात पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. आधी लेखी परीक्षा की शारीरिक चाचणी, असा संभ्रम पोलिस भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांत निर्माण झाला. पहिल्या टप्प्यात आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर, पोलिस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी गुरुवारी (ता.21) रात्री पोलिस दलाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. पोलिस दलात 12 हजार 500 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. त्यासाठी मागील काही वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी मैदानात घाम गाळत आहे. 2019 मध्ये निघालेल्या जाहिरातीत आधी लेखी परीक्षा व नंतर शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय झाला होता. 

आतापर्यंत पोलिस भरतीच्या सुरुवातीला आधी शारीरिक चाचणी होत होती. आधी लेखी परीक्षा घेणे म्हणजे उमेदवारांवर अन्याय करण्यासारखे आहे, असा सूर उमटला. यात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतील, अशी पुष्टी जोडण्यात येत होती. पाच हजार पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया 2019च्या अटींप्रमाणे घेण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात जवळपास आठ हजार जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. त्यात मात्र आधी शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. गृहमंत्री देशमुख यांच्या स्पष्टीकरणामुळे उमेदवारांतील संभ्रम दूर झाला आहे.

पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी 12 हजार 500 जागांसाठी दोन टप्प्यात भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. 2019मधील भरतीच्या अटींत कोणताच बदल होणार नाही. दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा असा निर्णय घेण्यात आला आहे.
- अनिल देशमुख
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli News : शिंदेंनी फिरविला राजकीय पट; कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला मनसेची साथ

Crime News : नोकरीच्या शोधात असलेल्या 19 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीचा निर्घृण खून; आमदाराच्या डेरीजवळ आढळला मृतदेह

Pune Grand Tour Viral Video: स्पर्धेत उतरू दिलं नाही… तरी सोशल मीडियावर पुणे ग्रँड टूरचे खरे विजेते ठरलेले व्हायरल आजोबा कोण?

Latest Marathi News Live Update : भारत न्यूझीलँड टी-20 सामन्यादरम्यान वर्धा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

China Population Decline : चीनची लोकसंख्या कमालीची घटली, अर्थव्यवस्था धोक्यात, महासत्ता होण्याचे स्वप्न राहणार अपूर्ण ?

SCROLL FOR NEXT