coronavirus-4923544_960_720.jpg 
विदर्भ

‘त्या’ कोरोना बाधित मृतकाचा नातेवाईक विलगीकरण कक्षात

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असताना तीन-चार दिवसापूर्वी वाशीम येथील काही नातेवाईक भेटण्यासाठी गेले होते. तसेच सदर रुग्णाच्या अंत्यविधीला सुध्दा काही नातेवाईक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाशीम येथील गंगू प्लॉट, बागवान पुरा, आरिफ नगर येथील डॉ. जिब्राल हॉस्पिटल परिसरातील एका नातेवाइकाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

वाशीम जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत व्यक्तीला आजारी असताना भेटण्यासाठी गेलेल्या अथवा त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्या वाशीम शहरातील व जिल्ह्यातील इतर नातेवाइकांनी सुद्धा स्वतःहून जिल्हा सामान्य रुग्णालयात संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यांची योग्य काळजी घेतली जाईल. 

तर जिल्हा प्रशासनाला कळवावे
या नातेवाइकांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT