file photo 
विदर्भ

भाड्याच्या खोलीत धान्य पासिंगचा "गोरखधंदा'

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. वाघापूर येथील सिद्घेश्‍वरनगरातील एका घरी भाड्याच्या खोलीत चालणाऱ्या धान्य पासिंगच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश "मनसे'ने केला. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी चांदनी शिवरकर या खासगी एजंट तोंडरे नामक व्यक्तीला सोबत घेऊन नक्षणे यांच्या घरी कित्येक महिन्यापासून धान्य पासिंगचा काळाबाजार करीत असल्याची माहिती मनसेला मिळाली. "मनसे'चे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी शुक्रवारी (ता.27) दुपारी धडक दिली. त्यांना धान्य पासिंगचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. हा प्रकार "मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी कॅमेराबद्घ केला. अधिकारी पोहोचण्यापूर्वीच निरीक्षण अधिकारी शिवरकर यांनी रुमला कुलूप ठोकून पळ काढल्याचा आरोप "मनसे'ने केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. भ्रष्टाचारास खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. डीएसओ यांनी उपविभागीय अधिकारी बक्षी यांना या प्रकाराची माहिती दिली. शासकीय दस्तऐवज बाहेर जातात कसे, असा प्रश्‍न उपस्थित केला. भराडी यांनी कार्यालयीन पंचनामा करून शिवरामवार व हमदापुरे यांच्या समक्ष सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणात निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष
धान्य पासिंगचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती यापूर्वी तहसीलदारांना देण्यात आली होती. तरीदेखील याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. आता पितळ उघडे पडले. गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT