file photo
file photo 
विदर्भ

तीस मिनिटांत रिपोर्ट; "रॅपिड अँटिजन टेस्ट'द्वारे कोरोनाचे निदान 

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोनाविरुद्घची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाकडून अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. कमी काळात जास्तीत जास्त तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी "रॅपिड अँटिजन टेस्ट'द्वारे अवघ्या 30 मिनिटांत कोरोनाचे निदान केले जात आहे. 

अँटीजेन टेस्टमधून पॉझिटिव्ह रिपोर्ट 
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोविड चाचणीसाठी आरटी-पीसीआरच्या मदतीने रॅपिड अँटिजन टेस्ट वापरण्याची शिफारस केली आहे. या चाचणीच्या माध्यमातून कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांची ओळख अतिशय जलद गतीने होत आहे. रॅपिड टेस्टींग किटद्वारे संशयिताच्या नाकातून स्वॅबचे नमूने घेतले जातात. अँटीजेन टेस्टमधून पॉझिटिव्ह रिपोर्ट येतात. त्या पॉझिटिव्ह रुग्णाला तत्काळ आयसोलेशन वॉर्डात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अशा बाधितांची आरटीपीसीआर चाचणी केली जात नाही. मात्र, एखाद्याला सर्दी, ताप, खोकला असेल आणि त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्यास स्बॅब नमूने आरटीपीसीआर चाचणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत पाठविले जाते. तेथे तपासणी करून पडताळणी केली जाते. जिल्ह्यात ज्या भागात जास्त बाधित आढळून येत आहेत. अशा ठिकाणी आरोग्य विभागाचे प्रशिक्षित कर्मचारी जाऊन थेट नमूने घेत आहे. रॅपिड अँटिजन 
टेस्टमुळे तत्काळ निदान होऊन उपचारात मदत मिळत आहे. 


यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस, नेर, पुसद, दारव्हा या तालुक्‍यात रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे. 50 प्रयोगशाळा तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत ही तपासणी होते. इतरही तालुक्‍यात 50-50 कीट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
-डॉ. तरंगतुषार वारे,जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ. 

प्रतिबंधित क्षेत्र अथवा संशयित रुग्ण आढळल्यास त्याचे तिथेच नाकातून नमूने घेऊन कीटद्वारे तपासणी करण्यात येते. कमी वेळात जास्तीत जास्त चाचणी करणे हा मुख्य हेतू आहे. टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आल्यास त्याच्यावर तत्काळ उपचार करणे सोयीचे झाले आहे. एखाद्याच लक्षणे आढळून येतात. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास मगच संशयिताचे स्बॅब आमच्याकडे निदानासाठी येतात. 
-डॉ. विवेक गुजर, सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ. 

—संपादन : चंद्रशेखर महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT