janjira tiger
janjira tiger e sakal
विदर्भ

'जंजिरा'ला लागला फास, बचाव पथक टिपेश्वरमध्ये दाखल

सकाळ वृत्तसेवा

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : टिपेश्‍वर अभयारण्यातील 'जंजिरा'नावाच्या वाघाला फास लागल्याचे आढळून आले आहे. तो काझण्यासाठी रेस्क्‍यू टीम अभयारण्यात दाखल झाली आहे.

विदर्भात ताडोबानंतर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांची संख्यादेखील लक्षणीय आहे. वाघांचे दर्शन या ठिकाणी हमखास होत असल्याने पर्यटकांची चांगली गर्दी असते. अभयारण्यातील वन मारेगाव परिसरात जंजिरा नावाच्या वाघाचा पाय फासात अडकला. वाघाने आपला पाय त्यातून कसाबसा सोडविला असला तरी त्याच्या पायात तारेचा फास अडकून असल्याने त्याच्या पायाला जखम झाली आहे. त्याच अवस्थेत तो जंगलात फिरत आहे. तो फास तसाच अडकून राहल्यास वाघाच्या जिवावरही बेतू शकते. मागिल वर्षी अशाचप्रकारे फास अडकून एका वाघाचा मृत्यू झाला होता. टिपेश्‍वर अभयारण्यात अशाप्रकारे तारांचा फास करून वाघांची शिकार केल्या जाते.

सध्या या अभयारण्यात लॉकडाउनमुळे 1 मेपर्यंत पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे हा फास कुणी व का लावला, हे शोधण्याचे आव्हान वन विभागापुढे आहे. टिपेश्‍वर अभयारण्यातील वनअधिकारी व कर्मचारी सध्या लॉकडाउनचा फायदा घेत आराम करीत आहेत. दरम्यान या वाघाचा फास काढण्यासाठी रेसक्‍यू टिमला अभयारण्यात पाचारण करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT