Award.JPG 
विदर्भ

‘पीडीकेव्ही’चे संशोधन केंद्र देशात ‘अव्वल’

अनुप ताले

अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ‘कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान’ हे संशोधन केंद्र देशात ‘उत्कृष्ट’ ठरले असून, त्यासाठी विद्यापीठाच्या या केंद्राला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.


जबलपूर येथे नुकत्याच झालेल्या ‘कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान’च्या वार्षिक कार्यशाळेमध्ये हा पुरस्कार ‘कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान’चे रिसर्च इंजिनिअर डॉ. प्रदीप बोरकर यांना प्रदान करण्यात आला. संशोधनामध्ये चुरस निर्माण होऊन अधिकाधिक नाविन्यपूर्ण व गरजेवर आधारित संशोधन व्हावे, या दृष्टिकोनातून अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या प्रकल्पामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये विविध बाबींवर गुण ठेवण्यात आले होते. परीक्षण समितीमध्ये रायपूर आणि जबलपूर येथील माजी कुलगुरू डॉ. अन्वर आलम, मा.कुलगुरू फैजाबाद तसेच डॉ. इलियास, पंतनगर कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.  बी. एस. बिष्ट हे सदस्य होते. 
 

यांचे हस्ते पुरस्कार प्रदान
हा पुरस्कार जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. बिसेन, उपरोक्त तीनही कुलगुरू, असिस्टंट डायरेक्टर जनरल डॉ. एस. एन. झा, कापणी पश्चात अभियांत्रिकीचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. के. त्यागी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातील कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या प्रकल्पाचे सर्व संशोधक, जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालयाचे सर्व संचालक, अधिष्ठाता व संशोधक प्रामुख्याने उपस्थित होते.

या गुणांनी मारली बाजी
पुरस्कारासाठी वीकली रिपोर्ट, मंथली रिपोर्ट, कोर्टली रिपोर्ट सादर करण्याची तत्परता, प्रकल्प समन्वयक लुधियाना यांचे कार्यालयाला वेळोवेळी तत्परतेने दिलेले उत्तर, घेतलेले प्रोजेक्ट दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे, संशोधन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर  विविध निर्मात्यांशी सामंजस्य करार करून सदर यंत्र अथवा तंत्रज्ञान व्यावसायिक दृष्ट्या बाजारात उपलब्ध करून देणे, रॉयल्टी किंवा तसेच लायसन्स याद्वारे जमा झालेला निधी, विकसित तंत्रज्ञानाचे किंवा यंत्राचे पेटंट, सॅंक्शन झालेलं बजेट व त्यावरील झालेला खर्च, नवीन संशोधन प्रकल्प, चालू संशोधन प्रकल्प व पूर्ण झालेले संशोधन प्रकल्प यांची गुणवत्ता, त्याची गरज तसेच या प्रकल्पांचे यशस्वी सादरीकरण इत्यादी बाबींवर गुण देण्यात आले. त्यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राने बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Viral Video : 'स्वतः कर्णधारपद सोडणार की PCB हकालपट्टी करणार?' पाकिस्तानी पत्रकाराचा थेट प्रश्न, सलमान अली आघा म्हणाला...

Mumbai News: घरेलू कामगारांचा सरकारला अल्टिमेटम, अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुदीची करावी; नेमक्या मागण्या काय?

T20 WC, SA vs ZIM: दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय... उपांत्य फेरीत न्यूझीलंडला भिडणार; दुसऱ्या Semi मध्ये इंग्लंड विरुद्ध....

SCROLL FOR NEXT