Jogendra Kawade sakal
विदर्भ

Jogendra Kawade : खानमपूर ग्रामसभेचा ठराव असंवैधानिक, प्रशासनाने कारवाई करावी; प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे प्रतिपादन

पांढरी खानमपूर येथील ग्रामसभेने काल गावात कुठल्याही महापुरूषांचे प्रवेशव्दार लवण्यात येणार नाही, असा ठराव पारित केला, मात्र तो घटनाविरोधी आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - पांढरी खानमपूर येथील ग्रामसभेने काल गावात कुठल्याही महापुरूषांचे प्रवेशव्दार लवण्यात येणार नाही, असा ठराव पारित केला, मात्र तो घटनाविरोधी आहे. कारण डॅा. बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर महापुरूष हे देशाची संपत्ती आहेत, ते देशाची शान असतात, त्यांच्या नावाने गावात कुठलीही वास्तु नको, असा ठराव घेणे म्हणेजच संविधानाचे उल्लंघन आहे.

अशा संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने पुढाकार घेवून त्वरित गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

श्री. कवाडे म्हणले, उद्या चालून ग्रामसभेने गावात एकही बौद्ध अनुयायी व्यक्ती रहायला नको असा ठराव बहुमाने पारित केल्यास प्रशासन त्याची अंमलबजावणी करेल काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पांढरी खानमपूर येथील प्रवेशव्दाराला मुद्दा मागील दीड महिन्यांपासून पेटलेला आहे.

प्रशाससाने त्यात योग्य तोडगा काढला असता तर परिस्थिती इतकी चिघळलीच नसती. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात काल झालेल्या घटनेमागे कुठली राजकीय शक्ती आहे का? याची तपासणी पोलिसांनी केली पाहीजे. निवडणुका तोंडावर आल्यानंतरच असा विद्वेष मुद्दाम पसरविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामसभेकडून अशा प्रकारचा ठराव घेणे चुकीचे आहे.

प्रशासनाने सुद्धा त्याची योग्य ती दखल घेत यातून सामोपचाराने तोडगा काढला पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली. तत्पुर्वी प्रा. कवाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हाधिकाऱ्यांकडून काल झालेल्या लाठीमाराच्या घटनेची माहिती जाणून घेली.

प्रवेश्वव्दाराला भीमशक्ती, शिवशक्ती ना द्यावे

खानमपूर येथील प्रवेशव्दाराच्या नामकरणाचा मुद्दा वादाचा विषय ठरला असल्याने प्रशासनाने समझोत्याची भुमिका घेवून गावकऱ्यांच्या सहमतीने या प्रवेशव्दाराला शिवशक्ती, भीमशक्ती प्रवेशव्दार असे नामकरण करावे, असेही त्यांनी सुचविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT