विदर्भ

श्‍वसन विभाग व्हेंटिलेटरशिवाय

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर  आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्‍वसनविकारासह क्षयाचे रुग्ण वाढत आहेत. याला अनुवांशिकतेसोबत प्रदूषण सर्वाधिक कारणीभूत आहे. केवळ उपराजधानीचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के शहरवासी श्‍वसनविकाराच्या विळख्यात आहेत. परंतु, मेडिकल-सुपर स्पेशालिटीतील श्‍वसन विकार विभागात कधीकाळी 4 व्हेंटिलेटर होते. परंतु, आता एकही व्हेंटिलेटर नाही. यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे.उपराजधानीत मेट्रोपासून तर रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे श्‍वसनाचे विकार वाढत आहेत. त्यात फुप्फुसातील श्‍वसननलिकांवर विपरीत परिणाम झालेले अनेक रुग्ण येत आहेत. न्यूमोनियाचा संसर्ग होत असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासते. वंशपंरपरा, एलर्जी, धूम्रपान, वायुप्रदूषण, मानसिक ताणतणाव, संसर्ग यामुळे श्‍वसनाचे आजार होतात. याशिवाय वायुप्रदूषण थेट फुप्फुसावर परिणाम करते. सिगारेट किंवा विडीच्या धुरात असलेल्या कार्बन मोनॉक्‍साइड, कर्ब, बेंझपायरीन याचा परिणाम थेट श्‍वसननलिकेवर होतो. फुप्फुसातील वायुकोष व रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन फुप्फुसाची लवचिकता कमी होते. दोन वर्षे वय असलेल्या श्‍वसनरुग्णांची संख्या 6 ते 8 टक्‍क्‍यांवर आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये दम्याचे प्रमाण दुप्पट आहे. महिलांचे 1.5 टक्के आहे, तर पुरुषांचे प्रमाण 3 टक्‍क्‍यांवर आहे. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात क्षयरोगाने ग्रस्त 1119 रुग्ण 2016 मध्ये उपचाराला आले. त्यापैकी 165 जणांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये हीच रुग्ण संख्या 1382 वर पोचली असून 191 क्षयरोगी दगावले. 2018 मध्ये 1,200 वर क्षयरोगी उपचाराला आले. असून त्यापैकी 152 जण मृत्यूपंथाला पोचले. चालू वर्षातही 80 वर क्षयरोगी दगावले असल्याची माहिती आहे.
सहा व्हेंटिलेटरचा प्रस्ताव
सुपरमध्ये स्वतंत्र श्‍वसनविकार विभाग उभारण्यात आला. तसेच मेडिकलमध्ये 50 आणि सुपरमध्ये 30 अशा 80 खाटांच्या या विभागात खाटांच्या दहा टक्के व्हेंटिलेटर असावे, असा नियम आहे. यानुसार 8 व्हेंटिलेटर या विभागात असावे. वॉर्ड हाउसफुल्ल असतो. मात्र, एकही व्हेंटिलेटरवर नसल्यामुळे या विभागाचा श्‍वास जिवावर बेतणारा ठरू शकतो. या विभागाला 6 व्हेंटिलेटर मिळावे, यासंदर्भातील प्रस्ताव नुकताच सादर करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT