विदर्भ

सेवानिवृत्ती लाभाची प्रक्रिया झाली सोपी; वर्धा पहिली जिल्हा परिषद

रूपेश खैरी

वर्धा : शासकीय सेवेतून कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या लाभासाठी भटकंती होत असल्याचे अनेकदा पुढे आले आहे. वर्ध्यात आता असे होणार नाही. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने सोपी झाली आहे. सेवानिवृत्तांची प्रकरणे ऑनलाइन मार्गी काढण्याचा निर्णय घेणारी वर्धा ही विदर्भातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ॲप विकसित करण्यात आला आहे. या ॲपचे नावच ‘सोपी’ (sopi-sydteem of pension illustrstion) असे ठेवण्यात आले आहे. यातून सर्वच प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास मिळणाऱ्या लाभाची सर्वच प्रकरणे ऑनलाइन होणार असल्याने ती नेमकी कुठे अडत होती, याची माहिती होणार असल्याने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करणे सोपे होणार आहे.

वर्ध्यात येत्या महिन्यापासून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लाभाची प्रक्रिया ऑनलाइन सादर करण्याच्या सूचना सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्ताच्या दिवशीच हा लाभ मिळावा, असा या मागचा उद्देश असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. ॲपची अंमलबजावणी करण्यासाठी आठ दिवसांचा काळ असल्याने या दिवसातच आठही पंचायत समित्यांनी सर्व माहिती अपडेट करण्याच्या सूचना विभागांना करण्यात आल्या आहेत.

सहा महिन्यांआधीच होणार प्रक्रिया

सेवानिवृत्त होणारा कर्मचारी या ॲपमधून शोधण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या सहा महिन्यांपूर्वीच प्रक्रिया सुरू करण्यास मदत होणार आहे. प्रक्रिया लवकर सुरू झाल्याने या कर्मचाऱ्यांना वेळीच लाभ देणे शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा प्रस्ताव सादर करण्यात बराच वेळ लागतो. हा ॲप कार्यान्वित केल्याने ही प्रक्रिया सोपी झाली आहे. यातून प्रकरण कुठे अडकले याची माहिती मिळाल्याने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करणेही सोपे होईल.
- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकरी, जि. प. वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT