RFO Deepali death officer Shivkumar arrested in Nagpur  
विदर्भ

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; उपवनसंरक्षक शिवकुमार नागपुरातून अटकेत; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

अमरावती ः मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी आएफएस अधिकारी असलेले उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना स्थानिक गुन्हेशाखा व धारणी पोलिसांनी नागपूर येथून शुक्रवारी सकाळी अटक केली.

पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी विनोद शिवकुमार यांच्या अटकेची पुष्टी केली. शिवकुमार हे गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा येथे उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरुवारी (ता. 25) रात्रीच गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले.

आर.एफ.ओ. दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी हरिसाल येथे शासकीय निवासस्थानी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्हरमधुन गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली चार पानाची चिठ्ठी धारणी पोलिसांनी जप्त केली. त्या चिठ्ठीमध्ये उपवनसंरक्षक शिवकुमार यांच्या त्रासाचा उल्लेख आहे. 

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्रप्रकल्प, अमरावती एम.एस.रेड्डी यांच्या नावे सदर चिठ्ठी दीपाली चव्हाण यांनी लिहिली आहे. कुणाच्याही ऐकण्यावरुन वारंवार निलंबित करणे, चार्जशिट दाखल करण्याची धमकी शिवकुमार यांच्याकडून मिळत होती. पुनर्वसनाची जबाबदारी असल्यानंतर ग्रामस्थांसमोर अनेकदा आपली बाजू ऐकून न घेता शिवकुमार यांनी शिवीगाळ केली. रजा कालावधीमधील सुटी नाकारण्याची शिफारस सुद्धा त्यांनी केली होती. असे दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार पानाच्या चिठ्ठीत नमुद केले आहे.

दरम्यान, अटकेत असलेल्या आयएफएस शिवकुमार यांना न्यायालयात हजर करून त्यांची पोलिस कोठडी घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली होती. मात्र, वृत्त लिहेस्तोवर त्याबाबतचा तपशील कळू शकला नाही.

गर्भवती असताना कच्च्या रस्त्याने फिरवले

गर्भवती असताना उपवनसंरक्षक शिवकुमार यांनी मालुर मध्ये कच्च्या रस्त्याने फिरवीले. त्यामुळेच गर्भपात झाला. त्यानंतर रजा सुद्धा दिली नाही. अमरावतीत सासर असताना महिन्यातून एकदाही घरी जाता आले नसल्याची खंत दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतुन व्यक्त केली.

अमरावतीत संघटना रस्त्यावर

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने विविध संघटनांनी आज रोष व्यक्त केला. दीपाली चव्हाण यांची हत्या झाली नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी सुद्धा जबाबदार असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. इर्विन रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. बेलदार समाज संघटनेच्या वतीने या घटनेबाबत तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT