file photo 
विदर्भ

तांदूळ तर मिळते भाऊ; पण भात कशासोबत खाऊ...मजुरांना पडला प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि. गोंदिया) : "तांदूळ तर मिळाले, पण आता भात कशासोबत खायचे' असा प्रश्न सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळालेला तांदूळ घरी घेऊन आलेल्या जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. लॉकडाउनच्या काळात शासनाने प्रत्येक व्यक्तीमागे पाच किलो धान्य रेशनकार्डधारकांना वितरण सुरू केले आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमागे आता केवळ पाच किलो तांदूळ मिळत आहेत. परंतु भाजीचे साहित्य विकत घेण्यासाठी मजुरांकडे पैसे नसल्याने आता भात कशासोबत खायचा, असा प्रश्न गोरगरीब नागरिकांना सतावत आहे.

रोजगार हिरावल्याने मजूर झाले चिंताग्रस्त

लॉकडाउनमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकडे सध्या एकही रुपया शिल्लक राहिला नाही. रोजगार हिरावल्याने त्यांची ही दशा झाली आहे. जवळ असलेले पै-पैसेही खर्च झाले. त्यामुळे त्यांची दोन वेळची चूल पेटणेही कठीण झाले आहे. लॉकडाउनच्या काळात गोरगरीब नागरिकांचे, मजुरांचे रोजगाराअभावी हाल झाले आहेत. सध्या त्यांच्या समोर कठीण दिवस आले आहेत.

गावातही त्यांना काम मिळेना

अनेक मजूर वेगवेगळ्या महानगर, शहरातून खेडेगावाकडे पोहोचले आहेत. आता त्यांना गावात कोणते काम मिळे, याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या गावातील मजुरांना काम नाही; तर बाहेरून आलेल्यांना काम कसे मिळणार, पैसाच नाही तर चिमुकल्यांना जगवायचे कसे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकंदरीत या लॉकडाउनने गरिबांपुढे दोन वेळेच्या भोजनाचा प्रश्न निर्माण केला आहे.

शासनाने इतर साहित्यही द्यावे

शासनाने धान्यासोबत तेल, तिखट, मीठ दिले असते; तर बरे झाले असते, भातासोबत ते खाता आले असते, असा सूर गावखेड्यातील कामगार, मजूरवर्गातून निघत आहे. कोरोनाच्या संकटाने सर्व सामान्याचे जीवन संकटात सापडले आहे. अनेकांसमोर कठीण समस्या निर्माण झालेली आहे. सध्या सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. आधी हे लॉकडाउन 3 मे रोजी संपणार असे सांगण्यात आले होते; परंतु लॉकडाउन आता 17 मेपर्यंत वाढविम्यात आले आहे. त्यामुळे मजुरांची दैन्यावस्था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT