Ration Card.jpg 
विदर्भ

काय म्हणता... आता रेशन दुकानातून सुद्धा कोरोना संसर्गाचा धोका!

सुगत खाडे

अकोला : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तुंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमॅट्रीक पडताळणी न करता त्यांना धान्य वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु सदर आदेश केवळ 3 मेपर्यंतच असल्याने यापुढे रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांना बायोमॅट्रीक पडताळणी करुनच (आंगठा दाखवून) धान्य मिळणार आहे. त्यामुळे रेशन दुकानातूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. 

जगभरात सर्वत्र पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आजारास प्रतिबंध व नियंत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालीन उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. यात रुग्ण शोध मोहीम, रुग्णांचे विलगीकरण व एकंदरच विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण या बाबींचा समावेश आहे.

या पार्श्‍वभूमीवर राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तुंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमॅट्रीक पडताळणी न करता रास्त दुकानदारांनी स्वतःचे आधार अधिप्रमाणीत करुन 3 मेपर्यंत धान्य वाटपाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून सदर सुविधा शासनाने दुकानदारांना उपलब्ध करुन दिली होती. परंतु सदर सुविधेला मुदतवाढ न दिल्याने यापुढे लाभार्थ्यांना बायोमॅट्रीक पडताळणी करुनच (आंगठा दाखवून) धान्य मिळणार आहे. त्यामुळे पॉस मशीनवर आंगठा लावल्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही. त्यामुळे रेशन दुकानातूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. 

सामाजिक अंतर पाळणे होणार अवघड
रेशन दुकानातून लाभार्थ्यांना बायोमॅट्रीक पद्धतीने धान्याचे वाटप करताना सामाजिक अंतर ठेवावे लागते. परंतु बायोमॅट्रीक पद्धतीने धान्याचे वाटप सुरु केल्यास रेशन दुकानदाराला लाभार्थ्यांचा अंगठा पॉस मशीनवर लावाला लागेल. त्यामुळे रेशन दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर पाळता येणार नाही. परिणामी सामाजिक अंतर ठेवण्याच्या शासकीय नियमांचे उल्लंघन होईल. 

शासनाने मुदतवाढ द्यावी
जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून एप्रिल महिन्यात रास्त दुकानदारांनी स्वतःचे आधार अधिप्रमाणीत करुन लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले. परंतु मे व जून महिन्यात लाभार्थ्यांना बायोमॅट्रीक पद्धतीने धान्याचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. परिणामी शासनाने जुन्या आदेशाला मुदतवाढ द्यावी. 
- सुभाषचंद्र शाह
जिल्हाध्यक्ष, सरकारी रास्तभाव दुकानदार असोसिएशन, अकोला

शासनाला माहिती दिली
शासनाने एप्रिल महिन्यासाठी लाभार्थ्यांची बायोमॅट्रिक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वतःचे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटप करण्याची मुभा दिली होती. मे व जून महिन्यासाठी नव्याने आदेश मिळाले नाहीत. यासंबंधी शासनाला माहिती देण्यात आली आहे. 
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT