Kidney Diseases esakal
विदर्भ

Urea Fertilizer : युरियाच्या अतिवापराने किडनीच्या आजाराचा धोका

हेक्टरी ७५ किलोची गरज असताना एकरी १०० किलोचा वापर

कृष्णा लोखंडे

अमरावती : युरियाच्या अतिवापराने भूगर्भातील पाणी प्रदूषित होऊन किडनी व आतड्यांचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून गैरसमजुतीपोटी उत्पादनवाढीसाठी मर्यादेपेक्षा अधिक वापर करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. युरियाला मिळणारी सबसिडी व कमी दर, यामुळे मागणी वाढण्यासोबतच वापरही वाढला आहे.

खरीप हंगामात आता पाऊस उघडल्यानंतर शेतकऱ्यांनी खतांचा वापर वाढविला आहे. युरियाचा वापर कमी व्हावा, यावर शासनाचा जोर आहे. मात्र शेतकऱ्यांकडून गैरसमजुतीपोटी व जनजागृतीअभावी वापर वाढला आहे.

१०० किलोच्या एका बॅगमध्ये ४६ किलो नायट्रोजन असून उर्वरित इतर घटकांचा समावेश आहे. हेक्टरी ७५ ते ७८ किलो युरियाचा वापर अपेक्षित असताना शेतकऱ्यांकडून एकरी एक बॅगचा वापर केल्या जात आहे. युरिया पाण्यात लवकर विरघळणारा असून हवेच्या सानिध्यात आल्यावर त्याची वाफ होते.

जमिनीच्या प्रतवारीवर त्याचे प्रमाण अवलंबून असताना शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करून अतिवापर करीत असल्याचे समोर आले आहे. या अतिवापरामुळे युरिया भूगर्भात झिरपत जाऊन पाणी दूषित होत आहे.

विशेषतः शेतालगतच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जलतपासणीत ५० मिलीग्रॅम प्रती लिटरवर आढळून आल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. टी. सावळे यांनी सांगितले. या पाण्याच्या सतत वापरामुळे काही वर्षांनी किडनी व आतड्यांचे आजार होऊ शकतात, अशीही माहिती त्यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, दर्यापूर, अंजनगावसुर्जी या तालुक्यांतील पाण्यात नायट्रोजनचे प्रमाण ४५ मिलीग्रॅम प्रती लिटर या मर्यादेपेक्षा अधिक आढळून आलेले आहे. शेतातील विहीर, लगतचे हातपंप, विहिरी, बोअरवेल या स्रोतांतून या पाण्याचा वापर होतो.

का करतात युरियाचा वापर?

युरियातील नत्रामुळे पिकांना उभारी यावी व जमिनीचा कस वाढावा, यासाठी वापर करण्यात येतो. युरियावर सर्वाधिक सबसिडी दिल्या जात असून बाजारमूल्य कमी आहे. २६६ रुपयांना ४५ किलोची बॅग विकत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी अधिक केल्या जाते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

नॅनो युरियाची एक बॉटलमध्ये एक बॅग युरियाची क्षमता आहे. नॅनो युरिया फवारणीतून देता येऊ शकते व त्याचा उपयोग प्रभावी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर वाढविणे अपेक्षित आहे.

-राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

युरियाचा वापर राज्यातील शेतांमध्ये ७३ टक्के केल्या जातो. मर्यादेपेक्षा अधिक वापर होऊ लागल्याने त्यातील नायट्रोजन हा घटक पाण्यात विरघळून तो झिरपत जलस्रोतांमध्ये येतो. या पाण्याच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम लगेच दिसून येत नसले तरी १८ ते २० वर्षांनी दिसू लागतात. त्यामुळे हे स्लो पॉयझन आहे.

-आर. टी. सावळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT