file photo
file photo 
विदर्भ

बिझीलॅन्डमध्ये साडेनऊ लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती ः नांदगावपेठ येथील बिझीलॅन्डमधील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी साडेसात लाखांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी (ता. 14) मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. शनिवारी (ता. 15) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बाब निदर्शनात आली. दोन्ही प्रतिष्ठानातून साडेनऊ ते दहा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला.
बिझीलॅन्ड येथील व्यापारी संकुलामध्ये कंचिता व सुभाष गारमेंटसह अनेक प्रतिष्ठाने आहेत. सुभाष बजाज व प्रकाश सेवानी यांनी दुकानात गारव्यासाठी लावलेल्या डक्‍टिंगची जाळी तोडून चोरटे आतमध्ये शिरले. त्यानंतर काऊंटरमधील सामान अस्ताव्यस्त करून धुमाकूळ घातला. श्री. सेवानी यांच्या दुकानातून साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली. शनिवारी (ता. 15) श्री. सेवानी यांनी दुकान उघडले असता, ही बाब निदर्शनात आली. चोरी करताना झालेल्या तोडफोडीत हजारोंचे नुकसान झाले.
सुभाष गारमेंन्टसमध्येही चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन लाख 70 हजारांची रोख रक्कम पळविली. श्री. सेवानी व श्री. बजाज यांच्या तक्रारीवरून नांदगावपेठ पोलिसांनी पसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरीच्या ठिकाणी नांदगावपेठ व गुन्हे शाखेचे पोलिस दाखल झाले. श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांचीसुद्धा मदत घेण्यात आली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर येथे कार्यरत रखवालदारांची पोलिसांनी चौकशी केली.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये दोघे
दोन्ही व्यापारी प्रतिष्ठानात घुसून चोरी करणाऱ्यांमध्ये दोघांचा समावेश आहे. चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात दोघांच्या हालचाली दिसून येतात. ते फूटेज पोलिसांनी जप्त केले.

रखवालदार असतानाही चोरी
बिझीलॅण्ड या व्यापारी संकुलामध्ये चोवीस तासासाठी रखवालदार आहेत. रात्रपाळीत रखवालदारांची संख्या अधिक असतानाही येथे चोरी झाली. जवळच्याच सिटीलॅण्डमध्ये चार महिन्यांपूर्वीही पाच प्रतिष्ठाने फोडण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT