Robbery complaints, both in police custody in Yavatmal 
विदर्भ

रोख रक्‍कम लुटल्याचा केला बनाव, पोलिसांकडे आला तपास आणि पुढे...

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : रोख रक्कम चोरट्यांनी लुटमार केल्याचा बनाव विविध घटनांत दोघांनी निर्माण केला. मात्र, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा समांतर तपास करून लुटमारीच्या तक्रारींचे बिंग उघडकीस आणले. दोघांनाही मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

मारेगाव पोलिस ठाण्यात 13 फेब्रुवारी रोजी एक लाख 18 हजार 995 रुपये तर, 13 मार्च रोजी 55 हजार 75 रुपये जबरीने चोरल्याची तक्रार करण्यात आली होती. फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हादेखील नोंदविण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार व त्यांच्या पथकाकडे या गुन्ह्याचा छडा लावण्याची जबाबदारी देण्यात आली. पथक मागील काही दिवसांपासून वणी, मारेगाव परिसरात होते. जिल्हा पोलिस दलाच्या अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली.

गोपनीय बातमीदार नेमून माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही सुगावा हाती लागत नव्हता. त्यामुळे पथकाने फिर्यादी संदीप वासुदेव चव्हाण (रा. बंदी वाढोणा, ता. मारेगाव) व शेख शकील शेख सत्तार (रा. पेंटूर, ता. वणी) यांच्याकडे तपास वळविला. दोघांनी लुटमारीची कोणतीही घटना घडली नसताना खोटी फिर्याद देऊन बनाव केला. पैशांच्या वैयक्तिक अडचणींमुळे आपण पोलिसांत तक्रार दिल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. त्यामुळे दोघांना पुढील कार्यवाहीसाठी मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिंमदवार, गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, सुमित पाळेकर, किशोर झेंडेकर, दत्ता दुमारे, निखिल मडसे आदींनी केली.


कठोर कारवाईचा इशारा

भविष्यात अशा प्रकारच्या खोट्या फिर्यादी दाखल झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित खोट्या तक्रारदारांविरुद्घ प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT