Amravati hospital 
विदर्भ

इर्विन रुग्णालयाच्या शवागारात कुजलेला मृतदेह कुणाचा? कुठेही नोंद नाही 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात चार ते पाच दिवसांपासून एक मृतदेह कुजल्याने दुर्गंधी पसरली. परंतु हा कुजलेला मृतदेह कुणाचा? शासकीय रुग्णालयाच्या शवागारात तो कुणी आणून ठेवला? याचे उत्तर संबंधितांकडे नाही. त्यामुळे रविवारी (ता. 28) जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला. 

इर्विन रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी जुन्या आणि नवीन फ्रिझरचा वापर केल्या जातो. रेल्वेने कटलेली असो किंवा पोलिसांनी आणलेला बेवारस मृतदेह असो, शवागारात मृतदेह ठेवायचा झाल्यास येथील एका वॉर्डातील रजिस्टरमध्ये त्याची नोंद होते. बेवारस जरी असला तरी तशी नोंद राहते. बेवारस मृतदेह ठेवल्यानंतर तीन दिवसांपर्यंत कुणी नातेवाइक न आल्यास पोलिसांकडून त्याचे शवविच्छेदन केल्या जाते. मृतदेह जर पोलिसांनी ठेवला असेल तर तसेही नोंदविल्या जाते. नातेवाइकांकडून डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार मृतदेह ठेवल्या जातो. 

सद्य:स्थितीत 35 वर्षे वयाचा (पुरुषाचा) मृतदेह कुजल्याने दुर्गंधी सुरू झाली. चार ते पाच दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. शवागारात शवविच्छेदनाचे काम करताना डॉक्‍टर व पोलिसांसह शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच अधिक वावर असतो. त्यांना दुर्गंधीमुळे अधिक त्रास होऊ लागला. त्यापैकी काहींनी रविवारी (ता. 28) आधी इर्विन रुग्णालयाच्या पोलिस चौकीत मृतदेह कुणी व केव्हा ठेवला, याबाबत चौकशी केली. त्यानंतर शव ठेवताना वॉर्ड क्रमांक 13 मध्ये नोंद होते. त्या नोंदीही तपासल्या. परंतु ज्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली तो कुणी आणून शवागारात ठेवला, याचा काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावानंतर विशेष काळजी घेतल्या जात आहे. तरीही असे दुर्लक्ष का झाले? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

प्रकरणाची चौकशी होईल 

मृतदेह कुणाचाही असो, तो शवागारात ठेवताना, नातेवाइकांच्या ताब्यात देताना तशा नोंदी इर्विन व संबंधित पोलिसांकडून घेतल्या जातात. परंतु याबाबत संभ्रम आहे. तीन दिवसांपेक्षा अधिक वेळ झाल्याने सोमवारी (ता. 28) पोलिसांना माहिती देऊन शवविच्छेदन केले जाईल. या प्रकरणी चौकशीही होईल, असे निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हुमने यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT