sprey 
विदर्भ

पुसदच्या तंत्रज्ञाने संशोधलेला गंजप्रतिरोधक स्प्रे आला बाजारात 

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : पुसद येथील अजय विश्वकर्मा या युवा तंत्रज्ञाने उपयोजित तंत्रज्ञानाचा उपयोग करून संशोधनातून तयार केलेल्या 'मल्टिपर्पज वॉटर रजिस्टंट सोल्यूशन'या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारतासाठी त्यांचा हा 'लोकल टू ग्लोबल' संशोधन प्रकल्प उल्लेखनीय ठरला आहे. 

पुसद येथील मोबाईल तंत्रज्ञानातील व्यावसायिक अजय विश्वकर्मा यांनी जिज्ञासू वृत्तीने काही नावीन्यपूर्ण संशोधन केले. त्यांनी तयार केलेले प्रकल्पाचे पेटेंट मंजूर झाले असून साई-वीर टेक्‍नॉलॉजी या माध्यमातून उत्पादनाच्या स्वरूपात बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहे. यापैकी 'मल्टिपर्पज वॉटर रजिस्टंट सोल्यूशन' हे उत्पादन सरफेस माउंट डिवाइस कॉम्पोनंट व सरफेस माउंट टेक्‍नॉलॉजी यावर आधारित इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌समध्ये उपयोगात आणले जाते. 

सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

हे उत्पादन म्हणजे एक प्रकारचे लिक्विड स्प्रे असून ते फवारल्यानंतर डिवाइसच्या पृष्ठभागाशी पाण्याचा संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे गंज तयार होऊ शकत नाही. आर्द्रता व गंज प्रतिरोधक गुणधर्मामुळे डिव्हाईसेसला संरक्षण मिळते. कम्युनिकेशन डिवाइसेस, लॅपटॉप आयपॅड, स्ट्रिटलाइट्‌स या पाण्याची भीती असलेल्या उपकरणात तसेच औद्योगिक क्षेत्रातील कुलर, बाथरूममधील दरवाजाच्या इंजिस, नट बोल्ट, स्क्रू यासाठी वापर होऊ शकतो. याच्या उत्पादन विक्रीची व्यवस्था एका कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. या उत्पादनाची किंमत ग्राहकांना परवडणारी आहे. 
 

अजय विश्वकर्मा यांनी अभियांत्रिकी पदविका संपादन केली असून त्यांना नवनवीन संशोधनाची आवड आहे. यापूर्वी त्यांनी चोरांपासून सुरक्षितता मिळविण्यासाठी उपकरण तयार केले. कोविडमध्ये निर्जंतुकीकरण उपकरण तसेच मोबाईल पाण्यात पडला तरी त्याचे संरक्षण करण्यासाठी लिक्विड शोधून काढले. त्यांचे सातत्यपूर्ण संशोधन सुरू असून आणखी काही उत्पादनाचे त्यांना पेटंट मिळवायचे आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT