संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

"त्या' हत्याकांडाचे अखेर गूढ उलगडले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः जुनी कामठी परिसरातील एका पडक्‍या विहिरीत एका युवकाचा खून करून मृतदेह फेकला होता. महिन्याभरानंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आहे. या हत्याकांडात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. उसणे घेतलेले दोन हजार रुपये परत देत नसल्याच्या कारणावरून मित्राचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 जुलैला सकाळी नऊला नवी कामठी परिसरातील खैरी शिवारात असलेल्या एका पडक्‍या विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळला होता. कामठी रोडवरील नोवाटेल हॉटेलच्या सिक्‍युरिटी गार्डने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला. मात्र, तो मृतदेह कुणाचा? याबाबत पत्ता लागला नाही. शेवटी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांनी हाती घेतला. सीसीटीव्ही आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून मृतदेहाची ओळख पटविली. शेख मतीन ऊर्फ माजिद जाकीर मतीन (वय 30, रा. फुकटनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याचे कळले. गुन्हे शाखेने तपास करून आरोपी महेश ऊर्फ मुकेश भय्यालाल खरे (वय 29, रा. राजीवगांधीनगर, यशोधरा) आणि शेख सलमान अब्दुल रहिम शेख (वय 25, न्यू येरखेडा, कामठी) यांना अटक केली.
आरोपी ऑटोचालक महेश खरे आणि शेख मतीन हे दोघे मित्र होते. दोघांनाही दारूचा नाद होता. शेख मतीन हा मूळचा अकोला जिल्ह्यातील मालेगाव येथील होता. कुल्फीचा व्यवसाय करण्यासाठी तो नागपुरात आला होता. मतीनने महेशकडून 2,000 रुपये उसणे घेतले होते. मात्र, पैसे परत करीत नव्हता. त्यावरून दोघांत अनेकदा मारहाणही झाली होती. तो वाद विकोपास गेल्याने मतीनचा काटा काढण्याचा कट महेशने रचला.
महेशने मित्र शेख सलमानला कटात सहभागी केले. कटाप्रमाणे दोघांनी 13 जुलैला मतीनला दारू पाजली. त्यानंतर त्याला ऑटोरिक्षाने खैरी परिसरात नेले. त्याच्या डोक्‍यावर दगडाने हल्ला केला. खून करून मृतदेह झाडीझुडपात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी पहाटेच जाऊन तो मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी एका पडक्‍या विहिरीत फेकला.
असा लावला छडा
एका मॅक्‍झिमा रिक्षाचे फुटेज एका सीसीटीव्हीमध्ये पुसटसे दिसत होते. पीआय हिवरे, एपीआय पंकज धाडगे, योगेश चौधरी, छत्रुघ्न कडू, प्रवीण गोरटे यांच्या पथकाने तब्बल 749 रिक्षांची तपासणी केली. त्यामध्ये आरोपी महेश खरे याचा पत्ता लागला. त्याला खाक्‍या दाखवताच त्याने हत्याकांडाची कबुली दिली. अशाप्रकारे अवघड गुन्ह्याची उकल झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT