Orphan Marriage sakal
विदर्भ

Orphan Marriage : अनाथ रूपाली, सपनाच्या हाताला लागली हळद

सदाशांती बालगृहातील कन्यांचा शाही विवाह सोहळा उद्या

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - आई- वडिलांच्या प्रेमाचे छत्र कधीच जीवनात न पाहिलेल्या सदाशांती आधारगृहातील दोन कन्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे साक्षीदार बनण्याचा योग अमरावतीकरांच्या नशिबी आला आहे. अगदी बालवयापासून आई -वडिलांचे छत्र हरविलेल्या अनाथ रूपाली आणि सपना या दोन मुलींचा विवाह सोहळा रविवारी (ता.५) सायंकाळी सहा वाजता वृंदावन कॅालनी येथील सदाशांती बालगृहात होणार आहे. हा क्षण आधारगृहातील मुलींच्या जीवनातील एक महत्वाचा क्षण ठरणार आहे.

मागील ३२ वर्षांपासून ६ ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार व निराश्रीत मुलींना मायेचा आधार देत त्यांना खडतर आयुष्यात जीवन जगण्याचे धडे देणाऱ्या सदाशांती बालगृहाचे संस्थापक डॅा. पी. एस. इंगळे, सचिव कुमुदिनी इंगळे, प्रा. पंकजा इंगळे तसेच उद्योजक व समाजसेवक राजेश अडगुलवार यांच्या प्रयत्नांतून अनाथ मुलींच्या जीवनात आनंदाचा क्षण आलेला आहे.

अगदी लहानपणापासून सदाशांती बालगृहात वाढलेल्या, शिकलेल्या रूपालीचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी किशोर यशवंत ढगे यांच्याशी तर सपनाचे लग्न अकोला जिल्ह्यातील योगेश बळीराम ताले यांच्याशी होत आहे. विशेष म्हणजे आपल्या पोटच्या मुलीप्रमाणेच इंगळे व अडगुलवार कुटुंबियांनी लग्नाची सर्व हौस पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

या विवाह सोहळ्याला पद्मश्री शंकरबाबा पापळकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, राज्य कर सहआयुक्त संजय पोखरकर, मनपा आयुक्त देवीदास पवार, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त विलास मरसाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय डबले, नरसम्मा महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. राजेश चंदनपाट, समाजसेवक डॅा. गोविंद कासट, डॅा. उमेश टेकाळे, कोषागार अधिकारी शिल्पा पवार, रिपल राणे, विलास साखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

खडतर प्रवासातील सोनेरी क्षण

निराधार, अनाथांचा सांभाळ करणारे सदाशांती बालगृह चालवित असताना कुमुदिनी इंगळे यांच्यासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र प्रत्येकवेळी त्या अडचणींवर मात करून इंगळे कुटुंबियांनी अनाथालयातील मुलींवर मायेची फुंकर घातली आहे.

आता सपना व रूपाली यांच्या विवाहाच्या निमित्ताने जीवनात पुन्हा एकदा सोनेरी क्षण आल्याचे कुमुदिनी इंगळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे उद्योजक राजेश अडगुलवार, स्वाती अडगुलवार यांनी या अनाथालातील संपूर्ण मुलींचे यथोचित वेळी कन्यादान व विवाह करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT