file re
file re 
विदर्भ

कीटकनाशकांच्या सुरक्षित फवारणीसाठी..!

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : सध्या खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे. पेरणीचे कामकाजही  आटोपत आले असून, लवकरच शेतीपिकांवर कीटकनाशकांची फवारणीसुद्धा केली जाणार  आहे. शेतकरी व शेतमजूर यांना कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याची  शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे होणाऱ्या विषबाधेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षित  फवारणीबाबत जनजागृती अभियान राबविण्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी  निर्देशित केले आहेत.

हे जनजागृती अभियान राबविण्याकरिता तालुका व ग्रामस्तरावर समित्यांची स्थापना  करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीची स्थापना तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत. संबंधित  तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस निरीक्षक व गटविकास अधिकारी हे समिती सदस्य  राहणार आहेत.

ग्रामस्तरीय समिती सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आली असून, कृषी  सहायक हे सदस्य सचिव राहतील. तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व आशावर्कर हे  सदस्य राहतील. समितीमार्फत गावातील फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना मागणीनुसार  संरक्षककीट वाटप करण्यात येईल. विषबाधा जनजागृती अभियानांतर्गत सुरक्षित फवारणी  कशी करावी, याबाबत सोशल डिस्टनचे नियम पाळून प्रचार व प्रसिद्धी केली जाईल.

शिवाय कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त याद्यांप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करणारे  शेतकरी व शेतमजुर याच्या आरोग्यतपासणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. लाल  रंगाच्या त्रिकोण असलेल्या कीटकनाशकांऐवजी पर्यायी कीटकनाशक वापरण्याकरिता  शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, संरक्षक किट न वापरता फवारणी करताना आढळून आल्यास  शेतकऱ्यांना समज देऊन दुष्परिणामांची जाणीव करून देण्याचे कामही समितीतर्फे करण्यात  येणार आहे.

गावामध्ये विषबाधा होताच बाधितास वाहनाद्वारे रुग्णालयात तत्काळ उपचराकरिता दाखल  करणे, विषबाधा झालेल्या व्यक्तीने कोणकोणते कीटकनाशकांची किती प्रमाणात फवारणी  केली, याची माहिती त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यास द्यावी, याबाबत समितीस सूचित  करण्यात आले आहे. कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,  कृषी केंद्रधारक यांनादेखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मार्गदर्शक सूचना करण्यात  आल्या आहेत.
 

शेतकरी, मजुरांनी घ्यावयाची काळची

शेतकऱ्यांना सूचना करताना फवारणीच्या अगोदर स्वच्छ अंघोळ करणे, पोटभर न्याहारी  करणे, फवारणीदरम्यान बिडी, सिगारेट, तंबाखू, खर्रा, दारू अशा मादक पदार्थांचे सेवन  कटाक्षाने टाळावे. फवारणीचे कामकाज आटोपल्यावर साबणाने स्वछ अंघोळ करून नंतरच  जेवण करावे. फवारणी ही वाऱ्याच्या दिशेने करावी, जेणेकरून स्प्रे पंपातून उडणारे  तुषारकण अंगावर उडणार नाहीत. फवारणीचे कामकाज हे सकाळी अथवा दुपारनंतर  उतरत्या उन्हाच्यावेळी करावे. शक्‍यतो दुपारच्या कडक उन्हात फवारणीचे कामकाज  टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : बुमराहने ऋषभ पंतला धाडलं माघारी; दिल्ली पार करणार अडीचशे धावांचा टप्पा?

SCROLL FOR NEXT